अभिनेता हार्दिक जोशी याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन

तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेता हार्दिक जोशी सोशल मीडिया वर खूपच सक्रिय असतो. नुकतेच त्याने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्याच्या हातात लहान बाळ दिसत आहे. या चिमुकल्या बाळासोबतचा फोटो सोशल मीडिया वर खूप वायरल झाला आहे. हार्दिकने हा बाळासोबतचा फोटो शेयर करताना लिहिले आहे की “माझ्या बहिणीच्या आयुष्यात आलेल्या या चिमूकल्यासाठी मी तिचे अभिनंदन करतो. अयांश तुझे आमच्या कुटुंबात स्वागत आहे.” काही वेळातच हा फोटो सोशल मीडियावर वायरल झाला असून चाहते आणि मराठी कलाकार कमेन्ट करून शुभेच्छा देखील देत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अभिनेता हार्दिक जोशी याने रंग पतंगा या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. परंतु हार्दिकला खरी ओळख मिळाली ती तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे. या मालिकेत हार्दिक जोशी राणादाचं पात्र साकारत होता तर अभिनेत्री अक्षया देवधर अंजली बाईच पात्र साकारत होती. नुकतंच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या शिवाय अभिनेता हार्दिक जोशी याने अस्मिता, क्राइम पेट्रोल यांसारख्या मालिकांमध्ये देखील छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.

Tags: Hardeek Joshi sister blessed with baby boy

Leave a Comment