‘गोव्याच्या किनाऱ्यावर’ फेम अभिनेत्री सिद्धी पाटणे लवकरच अडकणार विवाहबंधनात

सध्या अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत ,आणि आता आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्न करणार असल्याचे समजले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहे. गेल्या वर्षापासून अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. तर काहींचे साखरपुड्याचे फोटो समोर येतायत . आता आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्न करणार आहे. ‘गोव्याच्या किनाऱ्यावर’ फेम अभिनेत्री सिद्धी पाटणे लवकरच लग्न करणार आहे. तिच्या वाढदिवसाचा मुहूर्त पाहून तिने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली . तिचा होणारा पती विशाल दलाल सोबत तिने वाढदिवसाचे सेलिब्रेशन करतानाचे काही खास फोटोस पोस्ट केले आहेत.

‘गोव्याच्या किनाऱ्यावर’ या गाण्यातून सिद्धी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली . या गाण्यातील तिच्या लूकमूळे ती नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहिली . ‘गोव्याच्या किनाऱ्यावर’ या गाण्याने सिद्धीला एक वेगळीच ओळख मिळाली. यासोबतच तीला आपण स्टार प्रवाह वरील ‘श्री गुरुदेव दत्त’ आणि ‘सांग तु आहेस का ?’ या मालिकेंमध्ये देखील पहिले होते.

तर तुम्हांला सिद्धी आणि विशालची जोडी कशी वाटली हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा.

Leave a Comment