अभिनेत्री गिरिजा प्रभू हिला चाहत्याकडून मिळाले खास गिफ्ट

कोणत्याही कलाकारासाठी चाहत्यांकडून मिळणारं भरभरून प्रेम हीच कामाची पोचपावती असते. चाहत्यांच्या याच प्रेमामुळे नवं काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच काहीसा अनुभव सांगितला आहे तो अभिनेत्री गिरिजा प्रभूने. गिरिजा सध्या स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की की असतं’ या मालिकेत गौरीची भूमिका साकारत आहे. या मालिकेतील जयदीप-गौरीच्या जोडीला प्रेक्षकांच भरभरून प्रेम मिळत आहे. त्याचीच पोचपावती म्हणून गौरीच्या एका खास चाहत्याने गौरीला मालिकेतील फोटो आणि स्वलिखित एक पत्र भेट म्हणून दिलं.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सोशल मीडियाच्या काळात पत्र लिहिणं तसं मागे पडत चाललं आहे. चाहते कलाकारांना सोशल मीडियावर  आपली प्रतिक्रिया कळवत असतात. मात्र या चाहत्याने गौरी आणि मालिकेच कौतुक करणारं पत्र पाठवत मालिकेविषयी असणारं प्रेम व्यक्त केलं. या अनोख्या गिफ्टने गौरीही भारावून गेली. प्रेक्षकांच हे प्रेम असंच राहो अशी भावना तिने व्यक्त केली.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत सध्या गौरीने घर सोडलं आहे. गौरीला शोधण्याचे बरेच प्रयत्नही सुरू आहेत. गौरीचे चाहतेही सध्या तीला मालिकेत मिस करत आहेत. तिने लवकरात लवकर परत यावं अशी मागणीही करत आहेत. या पत्रातही तसा आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे.

Tags: Girija Prabhu got a special gift from her fan

Leave a Comment