घाडगे अँड सून मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
घाडगे अँड सून या मालिकेने आजपर्यंत प्रेक्षकांचे खूपच मनोरंजन केले आहे. या मालिकेने प्रेक्षकांना अगदी वेडं करून सोडलं होतं. परंतु जर तुम्ही या मालिकेचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे आणि ती म्हणजे हि मालिका लवकरच बंद होणार आहे. हो हे खरं आहे कि घाडगे अँड सून हि मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
या मालिकेतील अक्षय आणि अमृता यांच्या जोडीला प्रेक्षकांनी खूपच पसंती दर्शवली होती. घाडगे कुटुंबावर सर्वाचं निस्सीम प्रेम होतं. परंतु कियारा ने प्रत्येक वेळेस अक्षय आणि अमृता याना त्रास द्यायचं काम केलं आहे. मालिकेचा शेवट हा खूपच गोड होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कियारा देखील आपल्याकडून झालेल्या सर्व चुका समजून घेते आणि अक्षय अमृताला आपण केलेल्या चुकीच्या गोष्टींबद्दल माफी देखील मागते.
घाडगे अँड सून हि मालिका बंद होणार असल्याची माहिती खुद्द अमृताची भूमिका साकारणारी अभिनेत्री भाग्यश्री लिमये आणि कियाराची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर यांनी आपल्या सोसिअल मीडिया अकाउंट वर दिली आहे. प्रतीक्षा मुणगेकर आत्ता स्टार प्रवाहावरील अग्निहोत्र २ या मालिकेत समिहाची भूमिका साकारत आहे.
घाडगे अँड सून मालिकेचे शेवटचे एपिसोड आपल्याला २३-२८ डिसेंबर पर्यंत पाहायला मिळणार आहेत. डिसेंबर महिन्याच्या शेवटी हि मालिका सर्व रसिक प्रेक्षकांचा निरोप घेणार असून प्रेक्षक देखील मालिका बंद होतं असल्यामुळे नाराज आहेत. तर मित्रानो तुम्हाला काय वाटत मालिका बंद व्हावी कि नाही ते आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा!
Title: Ghadge and Soon serial end, Off air, Close, Band
Tags: Ghadge and Sunn, Ghadge and Sunn Serial end, Ghadge and Sunn end, Ghadge and Sunn serial off air, Ghadge and Sunn off air, Ghadge and Sunn serial close, Ghadge and Sunn close, Ghadge and Sunn malika band, Ghadge and Sunn latest update, घाडगे अँड सून