मराठी बिग बॉसच्या पहिल्या आणि दुसऱ्या पर्वानंतर खुप वाट पाहून अखेर बिग बॉस सीजन ३ सुरू झालं आहे. या पर्वात कोणकोण स्पर्धक आहेत,हे तर आपल्याला कळालेलच आहे. सुरवातीला हे सगळे स्पर्धक एका घरात गुण्यागोविंदाने जरी राहताना दिसले तरी काही दिवसातच यांच्यातले वाद आपल्याला पाहायला मिळणार हे मात्र नक्की.
बिग बॉसच्या घरात अभिनेत्री स्नेहा वाघ आणि अभिनेता आविष्कार दारवेकर ने एंट्री केली आहे. स्नेहा आणि आविष्कार हे दोघेही सिनेमालिका विश्वातील प्रसिद्ध चेहरे आहेत. हे दोघेही खऱ्या आयुष्यात नवरा बायको होते. लग्न झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच ते दोघेही वेगळे झाले. आणि आता पुन्हा दोघेही बिग बॉसच्या घरात एकमेकांसमोर आले आहेत. या घरात आता या दोघांची केमेस्ट्री कशी असेल हे पाहण उत्सुकतेच असणार आहे.
अभिनेत्री स्नेहा वाघ हिने अनेक हिंदी मालिका वीरा ,चंद्रगुप्ता मौरया , ज्योती , मेरे साई, अश्या गाजलेल्या मालिकेंमध्ये कामं केली आहेत. त्याचबरोबर अभिनेता आविष्कार दारवेकर हा देवा शप्पथ खोट सांगेन खरं सांगणार नाही, आई तुझा आशीर्वाद ,जुईली,सुवासिनीची सत्वपरीक्षा, मृत्यूपत्र, किरण कुलकर्णी vs किरण कुलकर्णी या अनेक सिनेमांमध्ये आणि तु माझा सांगाती या मराठी मालिकेत झळकला होता. आणि आता आपण या दोघांनाही बिग बॉस मराठी सीजन ३ च्या घरात पाहत आहोत.
तर या दोघांमध्ये केमेस्ट्री चांगली होईल की , सतत भांडण होतील ? तुम्हाला काय वाटत हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.