एलवीश यादव आज सोशल मीडियाच्या जगात एक लोकप्रिय नाव आहे, कारण अलीकडेच त्याने बिग बॉस ओटीटी 2 ची ट्रॉफीही जिंकली आहे. पण सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ,ज्यामध्ये तो एका यूट्यूबर मॅक्सटर्न उर्फ सागर ठाकूरला मारताना दिसत आहे.
एलवीश यादव Maxtern चा भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (एक्स) वर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हा व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेजच्या स्वरूपात आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एलवीश यादव त्याच्या 8 ते 10 मित्रांसह मॅक्सटर्नकडे येतो आणि त्यांना पाहताच तो मॅक्सटर्नला मारायला सुरुवात करतो.
व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसते की, एलवीश यादव Maxtern शी हस्तांदोलन करत नाही आणि थेट त्याला थप्पड मारण्यास सुरुवात करतो. आणि त्यानंतर त्याचे साथीदार त्याचा पाठलाग करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये एलवीश यादव मॅक्सटर्नला अनेकवेळा मारताना दिसत आहे.
यासोबतच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एलवीश यादव मॅक्स्टर्नला जीवे मारण्याची धमकी देताना दिसत आहे आणि एलवीश यादवसोबत असलेले लोक त्याला मॅक्सटर्नपासून दूर ढकलताना दिसत आहेत.
एल्विश यादव मॅक्स्टर्नची भांडणं का झाली?
एलवीश यादव आणि मॅक्सटर्न हे दोघेही YouTubers आहेत, आणि त्यांची भांडणं का झाली याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, पण सोशल मीडियानुसार, मॅक्सटर्नने ट्विटरवर अल्विश यादवचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये अल्विश यादवचा एक व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओमध्ये अल्विश आणि मुनावरचा फोटो होता.
त्यानंतर, मॅक्सटर्नने शेअर केलेल्या व्हिडिओवर, एल्विश यादवने त्या ट्विटचा हवाला देत लिहिले की , “भाई तू दिल्ली ही रहता है सोचा याद दिला दू”.
कोण आहे हा MAXTERN ?
मॅक्सटर्न उर्फ सागर ठाकूर हा एक लोकप्रिय YouTuber आणि सोशल मीडिया Influencer आहे, जो त्याच्या YouTube चॅनेलवर गेमिंग, व्लॉग आणि मजेदार व्हिडिओ अपलोड करतो. सागर ठाकूर याच्या यूट्यूब चॅनलवर 1 मिलियन पेक्षा अधिक सबस्क्राइबर्स आहेत. याशिवाय त्याचे इंस्टाग्रामवर 8 लाखांहून फॉलोअर्स अधिक आहेत.