अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या घरी लहान पाहुण्याच्या आगमनाची तयारी सुरू

झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेत नंदिता वहिनींची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या चर्चेत आहे ते तिच्या स्टयलिश फोटोशूटमुळे. धनश्री सोसिअल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. ती नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकॉउंटवर नवं-नवीन फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करून एक गोड बातमी शेयर दिली आहे. अभिनेत्री धनश्री काडगावकर प्रेग्नेंट असून लवकरच आई होणार आहे. धनश्रीने ही गोड बातमी सांगितल्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. प्रत्येक कलाकाराने आणि तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

यानंतर पुन्हा एकदा धनश्रीने एका ब्रँड साठी फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकॉउंटवर शेअर केले आहेत. या फोटो मध्ये ती आपल्याला बेबी बंप दाखवताना दिसत आहे. या फोटोत धनश्रीने हिरव्या आणि पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे आणि मॅचिंग मास्क लावला आहे. “Flaunting my baby bump with this beautiful green n yellow dress” असे कॅपशन तिने या फोटोला दिले आहे.

चाहत्यांना जेव्हापासून धनश्री आई होणार आहे हे समजले आहे तेव्हापासून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. धनश्रीच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे.

https://www.instagram.com/p/CGNOhLLh3OW/
https://www.instagram.com/p/CGRV8OMFdzX/

tags: Dhanashri Kadgaonkar Pregnant, Dhanashri Kadgaonkar Baby Bumb photo

Leave a Comment