अभिनेत्री धनश्री काडगावकर हिला पुत्ररत्न प्राप्ती

अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने सोशल मीडियावर आई झाल्याची गुड न्यूज सर्वांसमोर शेअर केली आहे. ‘मला सांगण्यात खूप आनंद होत आहे की २८ जानेवारीच्या सकाळी आम्हाला मुलगा झाला. मी आणि बाळ दोघेही निरोगी आहोत. तुम्ही सर्वांनी या दिवसात दिलेल्या शुभेच्छांसाठी मनापासून आभार’ अशी पोस्ट धनश्रीने केली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने पोस्ट करताच चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मराठी कलाकार देखील धनश्रीला शुभेच्छा देत आहेत. काही दिवसांपूर्वी धनश्रीने आपण गरोदर असल्याची बातमी हटक्या पद्धतीने दिली होती. धनश्री आणि तिचा पती दुर्वेश देशमुख यांनी फोटोशूट करत आपण लवकरच आईबाबा होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती.

तेव्हापासून चाहते धनश्रीला मुलगा होणार की मुलगी याची वाट पाहत होते. धनश्रीने जेव्हा आपण आई झाल्याची बातमी दिली तेव्हा तिचे चाहते खूप खुश झाले आहेत. धनश्री काडगावकरचं AtoZ मराठी कडून खुप अभिनंदन.

Tags: Dhanashri Kadgaonkar blesses with baby boy, dhanashri kadgaonkar baby boy, dhanashri kadgaonkar new born baby, dhanashri kadgavkar mulga

Leave a Comment