Dhananjay Powar: कलर्स मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस’ मध्ये कोल्हापूरचा लाडका रीलस्टार धनंजय पोवार स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर त्याने पुन्हा आपल्या कामावर परतले आहे. धनंजयचं स्वतःचं फर्निचरचं दुकान असून, बिग बॉस नंतर तो पुन्हा दुकानात जाऊन कामाला लागला आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो दुकानात प्रवेश करताना पाया पडताना दिसतो.

धनंजयने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “कितीही मोठी उंची गाठली तरी आपल्या पायरीला विसरायचं नाही.” यामध्ये तो आपल्या साधेपणावर आणि मुळाशी असलेल्या नात्यावर भर देतो.
बिग बॉसच्या घरात धनंजयने आपल्या ठसकेबाज कोल्हापूरी अंदाजाने आणि विनोदी बोलण्याच्या शैलीने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. धनंजय हा बिग बॉसमध्ये टॉप 4 स्पर्धकांपर्यंत पोहोचला होता. त्याच्या हास्यप्रधान व्यक्तिमत्त्वामुळे त्याने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं.
व्यक्तिगत आयुष्यात धनंजय विवाहित असून, त्याच्या पत्नीचं नाव कल्याणी पवार आहे. या दाम्पत्याला दोन मुलं आहेत. धनंजय पवार हा रीलस्टार म्हणूनही खूप लोकप्रिय आहे, आणि बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर तो आपल्या पूर्वीच्या साध्या आयुष्याकडे परतला आहे.
Nikki and Arbaaz :निक्की आणि अरबाजच एकमेकांवर खूप प्रेम आहे! अंकिताने सांगितल घरातली वस्तू स्तीथी!