झी मराठी वरील या मालिकेच्या अडचणीत वाढ, सापडली वादाच्या भोवऱ्यात.

झी मराठी वाहिणीवरील रात्रीस खेळ चाले 2 ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या ठिकाणी देवमाणूस ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत लागीर झाल जी फेम किरण गायकवाड डॉक्टरच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो आल्यानंतर प्रेक्षकांच्या काही संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहीजन या मालिकेचे कौतुक करत आहेत तर काही जणाच्या मते ही मालिका लहान मुलांच्या मनावर वाईट परिणाम करू शकते. सर्वसाधारणपणे झी मराठी वाहिणीवरील मालिका प्रेक्षक आपल्या संपूर्ण कुटुंबासोंबत पाहत असतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

परंतु देवमाणूस या नवीन मालिकेच्या प्रोमो मध्ये डॉक्टर एक महिलेला जीवे मारताना दिसत आहे. हीच गोष्ट प्रेक्षकांना खटकली आहे. देवमाणूस या मालिकेमुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सुर उमटला आहे. काही प्रेक्षकांच्या मते ही मालिका चालू नाही करायला पाहिजे कारण या मालिकेमुळे लहान मुलांच्या मनावर वाईट परिणाम होईल. सोशल मीडिया वरील या प्रतिक्रिया पाहून झी मराठीने मालिकेचा पहिलं प्रोमो न दाखवता आत्ता दूसरा प्रोमो दाखवायला सुरुवात केली आहे. त्यासोबत मालिका सत्य घटनेवर आधारित असल्याच देखील वाहिनीने नमूद केले आहे.

देवमाणूस या मालिकेवर प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. तरी देखील मालिकेला याचाच फायदा देखील होत असल्याच दिसून येत आहे. कारण प्रेक्षक कोणत्या ना कोणत्या कारणावरून या मालिकेची चर्चा करत आहेत. त्यामुळे या मालिकेचे प्रमोशन देखील होत आहे. रात्रीस खेळ चाले 2 ही मालिका 29 ऑगस्ट रोजी संपेल आणि त्या ठिकाणी 31 ऑगस्ट पासून रात्री 10:30 वाजता देवमाणूस ही आपल्याला पाहायला मिळेल.

तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, खरंच ही मालिका लहान मुलांच्या मनावर परिणाम करू शकते का? या मालिकेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा .

https://www.youtube.com/watch?v=twIybQXAkuo

tags: devmanus serial, dev manus new serial, dev manus zee marathi serial

3 thoughts on “झी मराठी वरील या मालिकेच्या अडचणीत वाढ, सापडली वादाच्या भोवऱ्यात.”

  1. Ho devmanus cha promo khup ghanerada ahe.
    Z marathi akhi sarvjan ektra pahto maja mulaga devmanus cha promo baghun tasach khach khuch kartoy. Tyamule amhi hi malika pahnyachi shakyata khup kami ahe….

    Reply

Leave a Comment