सुंदरा मनामध्ये भरली ही कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेला प्रेक्षक चांगलाच प्रतिसाद देत आहेत. या मालिकेतील लतिका, अभ्या या पात्रांना प्रेक्षकांनी खूप प्रेम केले होते. लतिका आणि अभ्या या जोडीला पण प्रेक्षक खूप पसंत करायचे. ही मालिका तब्बल १० वर्षांनी पुढे दाखवण्यात आली आहे. या मालिकेत लतिका आणि अभिमन्यू यांची मुलगी अदिरा हि १० वर्षांची दाखवण्यात आली आहे. लतिका आपल्या मुलीला आई आणि बाबा या दोघांचं प्रेम देतेय. पण अदिराला कुठे ना कुठे एका बापाची खूप कमी वाटते. तिची ओळख देवाशी होते. देवा आणि अदिरा यांची चांगली मैत्री होते. देवा हा अदिराचा बेस्ट फ्रेंड बनतो. देवा हा लतिकावरती म्हणजेच अदिराच्या आईवरती खूप प्रेम करतो. अदिरालाही तो आपली मुलगी म्हणून स्वीकारायला तयार आहे. तिला बापाचं प्रेम द्यायला तो तयार आहे.
येत्या २१ मे, रविवार दु. 12:00 वाजता या मालिकेचा एक तासाचा विशेष भाग आहे. देवा हा लतिकाला प्रपोज करणार आहे. त्या दोघांच्या नात्याची नव्याने सुरुवात होणार आहे. या दोघांचं नातं गोड होण्याचं कारण म्हणजे अदिरा . अदिरामुळे लतिका आणि देवा यांची मैत्री वाढली. लतिकाही देवावरती हळूहळू प्रेम करू लागली. लतिका आणि देवा यांची प्रेमकहाणी आता खऱ्या अर्थाने सुरु होणार आहे.
गुलाब देऊन आणि रिंग घालत देवा लतिकाला प्रपोज करणार आहे. लतिका देवाला म्हणते, कारखानीस मला माझ्या लेकीसाठी बाप पाहिजे आणि माझी सुख दुःख शेअर करण्यासाठी एक सखा आणि आयुष्यभर झाडे लावण्यासाठी एक जोडीदार. हा क्षण लतिकासाठी खूप खास असणार आहे. देवा आणि लतिका खूप खुश आहेत. येत्या रविवारी एक तासाचा विशेष भाग असून, हा एक तासाचा भाग प्रेक्षकांना खूप आवडेल. लतिकाही देवाला हो म्हणणार. या एका तासाच्या विशेष भागानंतर मालिका खूपच छान होणार आहे. रसिक प्रेक्षकही देवा आणि लतिकाच्या लग्नाची वाट पाहत आहेत. तेव्हा महारविवार आणि मालिका पाहायला अजिबात विसरू नका.
लतिका आणि देवा या दोघांना एकत्र पाहायला तुम्ही किती उत्सुक आहात? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.