सोनी टीव्ही वरील CID या क्राइम शो चा चाहता वर्ग मोठा आहे. या मालिकेतील प्रत्तेकाची भूमिका प्रेक्षकांना खुप आवडते. २०१८ ला या मालिकेने निरोप घेतला तरी अजुनही ही मालिका प्रेक्षक विसरू शकले नाही. या मालिकेतील दया म्हणजेच अभिनेता दयानंद शेट्टी लवकरच मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. त्याच्या आगामी चित्रपटाच नाव ‘गरम किटली’ असल्याच कळाल आहे. या सिनेमात दयासोबत आदित्य पैठणकर आणि श्रद्धा महाजन या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. चित्रसेन नाहक आणि राजेश हे या सिनेमाचे सहनिर्माते असुन या सिनेमाच्या शुटींगला सुरवात झालीये. चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद लेखन, दिग्दर्शन राज पैठणकर यांनी केलय.
तर तुम्ही दयाच्या या सिनेमासाठी उत्सुक आहात का हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.