अभिनेत्री, नृत्यांगना मीरा जोशीने काही दिवसांपूर्वी चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. होणाऱ्या नवऱ्यासोबत उरण बीच वरील फोटो तिने सोशल मीडिया वर शेअर केले होते. तिच्या चाहत्यांनी आणि कलाकारांनी तिला शुभेच्छा देखील दिल्या होत्या. पण तिच्या प्रियकराचा चेहरा मात्र तिने रीविल केला नव्हता. तिचा होणारा नवरा कोण असेल? तो काय करतो? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले होते. या सर्व प्रश्नांना आता पूर्ण विराम लागला आहे. मीराने आज सोशल मीडियावर तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटो शेअर केला आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव नेहूल वारुळे असे आहे. नेहूल हा एक नृत्यदिग्दर्शक आहे. फोटोवर सेव द डेट असे लिहिले असून, तारीख ५ सप्टेंबर, २०२३ अशी आहे. मग ही तारीख लग्नाची आहे की साखरपुड्याची आहे, हे मात्र दोघांनीही सांगितले नाही.
तिला एका चाहत्यांनी विचारले, तू लग्न करत आहेस का? त्यावर मीराने उत्तर दिले ५ सप्टेंबर पर्यंत वेट करा. म्हणजे येत्या ५ सप्टेंबरला मीराचे लग्न आहे की साखरपुडा, हे तिने गुपीतचं ठेवले आहे. तिचे चाहते या दिवसाची प्रतीक्षा करत आहेत. नेहूल वारुळे हा २०२१ साली झालेला मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा या कार्यक्रमाचा विजेता आहे. तो झी युवावरील डांस महाराष्ट्र डांस या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांचा ग्रुप देखील विनर झाला होता.
मीरा ही एक उत्तम नृत्यांगना, अभिनेत्री आहे. तुम्हाला मीरा आणि नेहूलची जोडी आवडते का? तुम्ही मीरा आणि नेहूलच्या लग्नासाठी उत्सुक आहात का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा. मीरा जोशी आणि नेहूल वारुळे यांना खुप साऱ्या शुभेच्छा.