स्टार प्रवाह वाहिनीवरील महेश कोठारे निर्मित ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ हि नव्याने सुरु झालेली मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. हि मालिका पौराणिक कथेवर आधारित आहे. गुरव समाजातील पुजारी आणि ग्रामस्थांनी या मालिकेच्या कथानकावर आक्षेप घेतला असून त्यांनी हि मालिका बंद करण्यास म्हंटले आहे.
गुरव समाजाच्या सरपंच राधाताई बुने यांनी ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेत चुकीचे कथानक तसेच खोटा इतिहास दाखवून भावना दुखावल्याबद्दल आणि खोटी माहिती प्रसारित केल्याबद्दल कोठारे प्रोडक्टशन वर कारवाई करण्याची मागणी केली आहे. उपसरपंच शिवाजीराव सांगळे यांनी मालिकेची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. तर ग्रामपंचायत सदस्य सुनील नवले यांनी मालिकेत चुकीची माहिती दाखवली तर खपवून घेतले जाणार नाही असा इशारा देखील दिला आहे.
Tags: dakhkhancha raja jotiba serial ban