झी मराठीवरील दार उघड बये मालिका ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेणार प्रेक्षकांचा निरोप!

मराठी मनोरंजन विश्वात नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात, तर काही मालिका निरोपही घेतात. चांगले कथानक असून देखील मालिका लवकरच निरोप घेतात, याची खंत देखील प्रेक्षकांना असते. आता झी मराठीवरील सर्वांची आवडती मालिका दार उघड बये लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका माहितीनुसार ७ ऑक्टोबरला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

गेल्या काही महिन्यांपूर्वी झी मराठीवरील २ मालिकांनी निरोप घेतला होता, त्यामुळे दार उघड बये मालिकेचा वेळ देखील बदलला होता. लोकमान्य, लवंगी मिरची या मालिकांनी निरोप घेतल्याने बऱ्याच मालिकांचा वेळ बदलण्यात आला. त्यामुळे दार उघड बये मालिका दुपारी २ वाजता प्रसारित झाली. नुकतेच या मालिकेचे शेवटचे शूटिंग पार पडले आहे.

संबळ वाजवणाऱ्या मुक्ताची कथा या मालिकेत दाखवण्यात आली होती. सानिया चौधरी, रोशन विचारे, शरद पोंक्षे, भाग्यश्री दळवी हे कलाकार दार उघड बये मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत होते. सानियाच्या सहकलाकारांनी भावुक पोस्ट देखील शेअर केल्या आहेत.

या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता रोशन विचारे आणि खलनायिकेची भूमिका साकरणारी अभिनेत्री भाग्यश्री दळवी सोनी मराठीवरील खरचं तिचं काय चुकलं? या नव्या कोऱ्या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

तर तुम्ही दार उघड बये या मालिकेला मिस कराल का? या मालिकेत सारंगची भूमिका साकारणारा अभिनेता रोशन विचारेची नवी मालिका खरचं तिचं काय चुकलं? पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment