चेन्नई सुपरकिंग्सचा मराठमोळा क्रिकेटपटू तुषार देशपांडेचा साखरपुडा संपन्न!

चेन्नई सुपरकिंग्सचा मराठमोळा गोलंदाज तुषार देशपांडेने साखरपुडा उरकलाय. सोमवारी मुंबईत त्याचा साखरपुडा संपन्न झालाय. तुषारने त्याची लहानपनीची मैत्रीण नभा गद्दमवार हिच्यासोबत साखरपुडा केला. School Days पासून नभा तुषारला आवडायची. या अगोदर चेन्नई सुपरकिंग्स चा फलंदाज ऋतुराज गायकवाड विवाह बंधनात अडकला होता. लवकरच तुषार देशपांडेही विवाह बंधनात अडकणार आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वर पोस्ट करत चाहत्यांना साखरपुड्या विषयी कळवले आहे. आयपीएल 2023 मध्ये तुषारने चांगलीच कामगिरी केली होती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तुषार आणि नभाच्या साखरपुड्याला चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज शिवम दुबे आणि त्याची बायको अंजुम खान ही उपस्थित होते. शिवमने सोशल मीडियावर पोस्ट करत तुषार आणि नभाला शुभेच्छा दिल्या आहेत. बऱ्याच क्रिकेटरनी आणि त्याच्या चाहत्यांनी सुंदर जोडप्याला साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. खुप साऱ्या Blessings तुषार आणि नभा यांना त्यांचे नातेवाईक आणि चाहत्यांनी दिल्या आहेत.

तुषारने सुंदर असे कॅप्शन लिहून, त्याच्या होणाऱ्या बायकोची ओळख करून दिली आहे. She got promoted from my school crush to My Fiance! नभाला बऱ्याच वेळा आयपीएल मध्ये csk ला सपोर्ट करतांना आपण पहिले होते. नभा ही एक पेंटर असून, ती गिफ्ट डिजायनर देखील आहे.

साखरपुड्याच्या Outfit मध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत. तुषारने शेरवाणी घातली असून,नभा साऊथ इंडियन मधील लुकमध्ये खूपच मनमोहक आणि सुंदर दिसत आहे. दोघेही खूपच गोड दिसत आहेत. तुषार आणि नभा यांच्या लग्नाची त्यांचे चाहते वाट पाहत आहेत.

Leave a Comment