दाक्षिणात्य अभिनेता रामचरणने त्याच्या अभिनयातून साऊथ इंडस्ट्रीत खुप नाव कमावले आहे. सर्वांचा आवडता रामचरणने साऊथ सोबत हिंदी इंडस्ट्री मध्ये सुद्धा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तो 2012 साली उपासना कामिनेनी सोबत विवाह बंधनात अडकला होता. उपासना ही एक बिजनेस वुमन आहे. या दोघांच्या लग्नाला 11 वर्षे झाली आहेत.
उपासना आणि रामचरण आई बाबा झालेत. काल 19 जूनला उपासनाला हैदराबाद मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज 20 जूनला उपासनाने एक गोड मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडिया वर गोड बातमी कळताच सर्वांनी बाळाला आणि आईबाबांना खुप शुभेच्छा दिल्या आहेत. साऊथ कलाकार तसेच हिंदी कलाकार आणि चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
रामचरण हा साऊथचे मेगास्टार चिरंजीवी यांचा मुलगा आहे. अभिनेते चिरंजीवी यांनी ट्विट करत आपल्या नातीचं स्वागत केलं आहे. आपण आजोबा झाल्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. रामचरणने बाळाच्या जन्माअगोदर काही तास त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वर पोस्ट करत संगीतकार काल भैरवचे मनापासून आभार मानले आहेत. कारण संगीतकार काल भैरव ने खास उपासना आणि रामचरणच्या बाळासाठी मस्त अशी ट्यून बनवली होती.
सध्या सोशल मीडिया वर सगळीकडे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आई आणि बाळ दोघांची प्रकृती चांगली आहे. कामिनेनी आणि कोनिदेला फॅमिलीमध्ये सध्या खुप आनंदाचे वातावरण आहे.