आई खातेय जेलची हवा, वडील फरार! नवा गडी नवं राज्य मधील चिंगीने मालिका सोडली.

बालकलाकार साईशा भोईर ही नवा गडी नवं राज्य या मालिकेत चिंगीची भूमिका साकारत होती. आता ती या मालिकेत आपल्याला दिसणार नाही. तिने आतापर्यंत खूपच छान अभिनय केले होते. तिने ही मालिका सोडली आहे. . यामागचे कारण समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी साईशाची आई पूजा भोईर यांना अटक करण्यात आली होती. तिच्या आईने जवळपास तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याने 7 जुलैपर्यंत त्यांची कोठडी वाढविण्यात आली आहे. पोलिसांनी साईशाची आई पूजा भोईर आणि वडील विशांत भोईर यांची मालमत्ता सुद्धा जप्त केली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सोशल मीडियावर सध्या पैशांच्या फसवणूकप्रकरणी चर्चेला खुप उधाण आले आहे. नवा गडी नवं राज्य मालिकेतील निर्मात्यांनी साईशाला मालिका बाहेर काढले आहे, अशी चर्चा होत आहे. पण साईशाने स्वतः ही मालिका सोडली आहे. हा निर्णय तिच्या घरच्या लोकांनी घेतला आहे, असं म्हटलं जात आहे. चिंगीच्या भूमिकेत आता दुसरी बालकलाकार दिसणार आहे. ही बालकलाकार मुलगी झाली हो मालिकेतील गोजिरी म्हणजेच आरोही सांबरे आहे. ती आता चिंगीची भूमिका साकारणार आहे.

साईशाची आई जेलमध्ये असून, वडील फरार आहेत. साईशाची आईने काही दिवसांपूर्वी एका जोडप्याला १६ लाखांचा गंडा घातला आहे. अस आरोप त्यांच्यावर आहे. साईशाचे वडील विशांत भोईर यांनी देखील बऱ्याचलोकांना पैशाबाबतीत फसवणूक केली आहे, अशी चर्चा सर्वत्र आहे. विशांत आणि पूजा यांनी साईशासोबत बऱ्याच आंतरराष्ट्रीय ट्रीप केल्या असून, त्याचीही चौकशी पोलिस करणार आहेत.

नवा गडी नवं राज्य या मालिकेत साईशा भोईरला चिंगीच्या भूमिकेत तुम्ही मिस कराल का ? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment