गर्भधारणा हा स्त्रीच्या जीवनातील एक परिवर्तनात्मक टप्पा आहे आणि या काळात शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखणे खूप महत्त्वाचे आहे. गर्भधारणेदरम्यान प्रसवपूर्व योग हा व्यायामाचा एक उत्तम प्रकार आहे आणि तो श्वासोच्छवासाच्या तंत्रावर लक्ष केंद्रित करून शरीराला एका नव्या जन्मासाठी तयार करतो. सेलिब्रिटी योगा ट्रेनर रुपल सिद्धपुरा फारिया हिने मनोरंजन उद्योगातील मुख्य मॉम ना उत्तम मार्गदर्शन दिलं आहे. बॉलीवुड ची बेबो म्हणजे करीना कपूर, सोहा अली खान आणि सुरवीन चावला यांना रुपल ने आज पर्यंत ट्रेन केलं आहे. या सेलिब्रिटी नी त्यांच्या गरोदरपणात आणि बाळंतपणानंतरही रुपलसोबत योगाभ्यास कसा केला आणि त्याचं ट्रान्सफॉर्मरमेशन कसं झालं बघू या !
सोहा अली खान
बॉलीवुड ची प्रसिद्ध अभिनेत्री सोहा अली खानने तिच्या गरोदर पणात रुपल कडून प्रशिक्षण घेतलं. श्वास घेण्यापासून आणि आराम कसा करावा या प्रस्तुती पूर्ण शिक्षणासाठी तिने सोहा ला खास टिप्स दिल्या यामुळे तिला प्रसूती आणि जन्मादरम्यान मदत झाली. तिची गर्भधारणा जसजशी वाढत गेली तसतशी तिची योगा दिनचर्या बदलत गेली. ” सोहा खूप तंदुरुस्त आहे त्यामुळे आम्ही आणखी बरेच काही करू शकतो. अर्थात, मला दर आठवड्याला गर्भाचा विकास कसा होत आहे हे लक्ष ठेवायचा होत अस रुपल म्हणते.
करीना कपूर खान
वहिनी सोहा अली खान नंतर अभिनेत्री करिना कपूर खानने मुलगा जहांगीर गरोदर असताना एका बहुराष्ट्रीय ऍथलेटिक फुटवेअर ब्रँडसाठी जाहिरात फिल्म शूटच्या काही दिवस आधी रुपलकडून मदत घेतली. यात रुपलला तिने अनेक आसन दाखवली ज्या मुळे केवळ सौंदर्याचीच नाहीत तर ती शूट करण्यास देखील फिट राहिली. ” मी तिला शूटसाठी तयार करण्यासाठी तिला भेटले कारण त्यात ती प्रसवपूर्व योगा करत होती. मी तिला सहजतेने आसने करण्याचे प्रशिक्षण दिले. मी गर्भधारणेदरम्यान तिच्या शरीरात होणारे सर्व बदल लक्षात घेऊन तिच्यासाठी सुरक्षित आसने निवडली अस रुपल सांगते. जेहला जन्म दिल्यानंतर तिने रुपलसोबत योगाचे धडे सुरूच ठेवले.
सुरवीन चावला
रुपल सिद्धपुरा फारियाने तिच्या गरोदरपणात अभिनेत्री सुरवीन चावलालाही ट्रेन केलं.रुपलच्या मार्गदर्शनाने सुरवीनला सक्रिय राहण्यात गर्भधारणेतील अस्वस्थता दूर करण्यात आणि शांततेची भावना निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. “सुरवीन ही अशी व्यक्ती होती जिने प्रसवपूर्व योगास तिच्या डॉक्टरांनी सुचविल्यानंतर ती करायला सुरुवात केली.” असं रुपल म्हणते.