ज्येष्ठ रंगकर्मी सरोज कोठारे (जेनमा) यांचे वृद्धापकाळाने निधन

ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य-चित्रपट निर्मात्या सरोज ऊर्फ जेनमा कोठारे (वय ९३) यांचे आज सायंकाळी कांदिवली येथील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक महेश कोठारे, नातू प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता आदिनाथ कोठारे असा परिवार आहे. कांदिवली येथील स्मशानभूमीत रात्री सरोज कोठारे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जेनमा कोठारे यांचे मूळ नाव … Read more

अभिनेते रविंद्र महाजनी काळाच्या पडद्याआड! घरातच आढळला मृतदेह

अभिनेते रविंद्र महाजनी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांची ओळख मराठी सिनेसृष्टीतील विनोद खन्ना अशी होती. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी पुण्यातील घरात अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळला असून, गेल्या 7, 8 महिन्यांपासून ते एकटेच राहत होते. शुक्रवारी शेजाऱ्यांनी रविंद्र महाजनी यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने पोलिसांकडे तक्रार केली … Read more

कोकणचा चेडू प्राजक्ता वाडये सन मराठी वरील “क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” मालिकेत साकारणार ‘बायो’ हे मालवणी पात्रं

‘सोहळा नात्यांचा’ हे ब्रीदवाक्य असलेली सन टीव्ही नेटवर्कची ‘सन मराठी’ वाहिनी गेली दोन वर्षे वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून, मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ही वाहिनी आणि प्रेक्षकवर्ग यांच्यातील नातं आता अतूट आहे. या वाहिनीवरील प्रत्येक मालिका प्रेक्षकांना जिव्हाळ्याची वाटते आणि आता यामध्ये श्री देव वेतोबाची कथा मांडणारी “क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” ही आणखी एक नवी मालिका … Read more

प्रवीण तरडेंचा विनोदी अंदाज!

वैविध्यपूर्ण भूमिकांमधून लेखक, अभिनेता प्रवीण तरडेंनी त्यांची स्वतःची वेगळी शैली निर्माण केली आहे. नेहमीच दमदार भूमिकांमध्ये दिसणारे प्रवीण तरडे प्रथमच एका विनोदी भूमिकेत आपल्याला पहायला मिळणार आहेत. ‘दिनिशा फिल्म्स’ निर्मित ‘आणीबाणी’ या मराठी चित्रपटात त्यांचा हा विनोदी अंदाज पहायला मिळणार आहे. हा चित्रपट २८ जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आणीबाणी’ सारखा संवेदनशील विषय रंजकपणे … Read more

जिओ स्टुडिओजच्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची बॉक्सऑफिसवर घोडदौड सुरुच.. दोन आठवड्यात केली तब्बल ३७.३५ कोटींची कमाई..

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि  केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटानं प्रदर्शना आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता.  सहा बहिणींच्या कथेच्या माध्यमातून ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटानं प्रत्येक स्त्रीला जगण्याचा नवा अर्थ देत स्वतःसाठी जगायला शिकवलं. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर बॉक्सऑफिसवर त्याची सुरू असलेली घोडदौड प्रेक्षकांच्या पसंतीची मोठी पोचपावती म्हणावी लागेल. हा चित्रपट प्रदर्शनानंतर बॉक्सऑफिसवर कमाई करण्यासोबतच … Read more

‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या मालिकेत दीप्ती केतकर नकारात्मक भूमिकेत!

निरनिराळे विषय आणि रंजक मालिका घेऊन सोनी मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. त्यांतील आगळेवेगळे विषय कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. मालिकेतील काही व्यक्तिरेखा कायमच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. तशीच एक नवी मालिका सोनी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येते आहे. ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. याआधी विविध व्यक्तिरेखांतून प्रेक्षकांच्या … Read more

‘आणीबाणी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित!

‘आणीबाणी’ हा चार अक्षरी शब्द ऐकला की, तो काळ प्रत्यक्ष अनुभवलेल्यांच्या काळया आठवणी जागृत होतात. त्यामुळे पुन्हा ‘आणीबाणी’ नको अशी भावना असलेल्या जनतेला आता मात्र मनोरंजनाच्या आणीबाणीला सामोरं जावं लागणार आहे. येत्या २८जुलैला मनोरंजनाची ही ‘आणीबाणी’ लागू होणार आहे. तत्पूर्वी मनोरंजनाची ही ‘आणीबाणी’ नेमकी काय असणार आहे? याची झलक नुकतीच एका शानदार कार्यक्रमात दाखविण्यात आली. … Read more

अभिनेता करण कुंद्रा ने प्लॅस्टिकऐवजी मेटल बॉटल च केले वाटप !

पर्यावरणीय आव्हानांना सध्या सगळेच तोंड देत आहेत आणि म्हणून अश्या परिस्थितीत पर्यावरणाच भान ठेवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करायला हवा आणि म्हणूनच अभिनेता करण कुंद्रा, यांनी पर्यावरण संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी एक अनोखं पाऊल उचललं आहे. त्याने एक उल्लेखनीय उपक्रम केला असून या अंतर्गत त्याने प्लास्टिक ऐवजी मेटल च्या बाटल्यांचे वितरण केले आहे पर्यावरणपूरक संदेश दिला … Read more

रंग दे नीला च्या #BluePledge मध्ये प्रख्यात अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि अनेक दिग्गज व्यक्तींच्या सहकार्याने डायबेटिक न्यूरोपॅथीबद्दल जागरुकता वाढवणार !

रंग दे नीला हा एक असा उपक्रम आहे जो क्रॉस-सेक्टरल जीवन समृद्ध करण्यासाठी लोकांना मदत करतो. विशेषतः मधुमेहाबद्दल व्यक्तींना शिक्षित करण्यासाठी हा अनोखा समर्पित उपक्रम आहे. रंग दे नीला ने एक प्रतीकात्मक चिन्ह सादर केले आहे जे डायबेटिक न्यूरोपॅथीबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी मदत करणार आहे. ग्रामीण भागातील या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय महिला आणि बालविकास आणि अल्पसंख्याक … Read more

जवानमधील संवादांसाठी शाहरुख खानने सुमित अरोरा च केल कौतुक !

शाहरुख खानसोबत जवान या चित्रपटात काम केल्याबद्दल सुमित अरोरा यांनी ट्विट केले आहे. त्याने लिहिले, “एक स्वप्न सत्यात उतरले आहे… एकमात्र SRK साठी संवाद लिहिणे… मुख्य @Atlee_dir @RedChilliesEnt @_GauravVerma #JawanTeaser” सुमित अरोरा मनोरंजनाच्या जगासाठी अनोळखी नाही त्यांनी अलीकडच्या सुपरहिट चित्रपटासाठी आणि मालिकांसाठी संवाद लिहिले आहेत. स्त्री, द फॅमिली मॅन आणि दहाड या दमदार प्रेक्षकांना हसवणाऱ्या … Read more