बार्बीचा ड्रीम केन अभिनेता रोहित सराफ याचे पिंक अफेयर !

जिथे बार्बी आणि केन फॅशन यांच्या चर्चा होत आहे यात अनेक कलाकार देखील आपल्या पिंक अफेयर बद्दल पोस्ट करताना दिसत आहे आणि हाच खास ट्रेंड फॉलो केला अभिनेता रोहित सराफ ने !डॅशिंग व्यक्तिमत्व असलेला अभिनेता रोहित सराफ हा असाच एक स्टार आहे जो केन च्या फॅशन ची शैली आणि करिष्मा दाखवतो. बार्बी पिंक शर्ट: रोहित … Read more

कृतज्ञ मी… कृतार्थ मी! अशोक सराफ यांच्या हस्ते कृतज्ञता सन्मान.

गेल्या वर्षी ४ जून रोजी अष्टपैलू विख्यात नट अशोक सराफ यांनी वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्त त्यांच्या अभिनय कारकिर्दीचे कथन ‘मी बहुरूपी’ या पुस्तकाद्वारे प्रसिद्ध झाले. त्यासाठी लाभलेले प्रायोजकत्व निधीचा विनियोग रंगमंच तंत्रज्ञ, कलावंत अशा वयोवृद्ध कलाकारांचा त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञतासन्मान करण्यासाठी करावा, अशी इच्छा अशोक आणि निवेदित सराफ यांनी व्यक्त केली. सुभाष सराफ आणि … Read more

चित्रपटाची अफलातून कमाई!

तीन जिवलग डिटेक्टिव्ह मित्रांची मजेशीर धमाल असणाऱ्या ‘अफलातून’ चित्रपटाला प्रेक्षकांची अफलातून पसंती मिळाली असून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर यांसह विविध शहरांतून सगळ्याच वयोगटांतील प्रेक्षकांनी चित्रपटाचे जोरदार स्वागत केले आहे. शुक्रवारी अफलातून प्रदर्शित झाला असून आज तिसऱ्या दिवशीसुद्धा चित्रपटाला प्रेक्षक पसंतीची पावती देत आहेत. पहिल्याच दिवशी चित्रपटाने ०.९५ कोटींची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी … Read more

जिओ स्टुडिओजच्या ‘बाईपण भारी देवा’ची 24 दिवसांत 65.61 कोटींची भरारी!

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास 24 दिवस झाले आहेत तरीदेखील प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयीचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसत नाही. अजूनही थिएटर्समध्ये महिलांचे ग्रुप्स मोठ्या संख्येनं एकत्रित चित्रपट पाहण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शना आधीच प्रेक्षकांमध्ये ‘बाईपण भारी देवा’ विषयी उत्सुकता पहायला मिळाली होती, बॉक्सऑफिसवर हा … Read more

स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांचा साखरपुडा संपन्न

अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशीष कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. आमचं ठरलंय म्हणत दोघांनी चाहत्यांना गोड बातमी दिली होती. कलाकार आणि चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. त्यानंतर स्वानंदी आणि आशिषच्या साखरपुड्याची जोरदार तयारी चालू होती. साखरपुड्याच्या मेहंदीची त्यांची तयारी जोरदार चालू होती. दोघांनी मेहंदीचे फोटो सोशल मीडिया वर पोस्ट … Read more

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचा साखरपुडा संपन्न!

बिग बॉस मराठी 4 सीजन हा खूपच गाजला. या सीजन मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी. बिग बॉसच्या घरात आपल्याला त्या दोघांची मैत्री पाहायला मिळाली होती. बिग बॉस नंतर दोघेही एकमेकांसोबत चांगलाच टाइम स्पेंड करत होते. सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो शेअर करायचे. जेव्हा प्रसाद आणि अमृता यांना त्यांच्या … Read more

अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या डान्स रील्सने 50 दशलक्ष व्ह्यूज आणि 150k व्ह्यूज चां ओलांडला टप्पा !

तमन्ना भाटियाने तिच्या प्रभावी अभिनय कौशल्याने आणि उल्लेखनीय नृत्य कौशल्याने तिच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत. जी करदा आणि लस्ट स्टोरी 2 च्या अलीकडच्या तिच्या प्रोजेक्ट्स च्या यशाने उंच भरारी घेतल्यानंतर तमन्ना जेलरच्या कावला या तमिळ गाण्यावर तिच्या डान्स मूव्ह्ससह पुन्हा चर्चेत येत आहे.जिथे ती ‘थलैवा’ रजनीकथसोबत खास डान्स करताना दिसतेय. गाण्यावरील डान्स रील्सने जगभरातील दर्शकांना … Read more

कोण होणार करोडपतीच्या मंचावर सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित यांच्यासोबत रंगणार गप्पांची मैफिल!

जनसामान्यांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘कोण होणार करोडपती’. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या  कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित ही जोडी हॉट सीटवर येणार आहेत. ‘कोण होणार करोडपती’मध्ये नर्मदा नवनिर्माण अभियान साठी खेळणार आहेत. या पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित यांच्याशी … Read more

‘बापल्योक’ साठी नागराज मंजुळे आणि मकरंद माने आले एकत्र!

आपल्या सशक्त कलाकृतींतून आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे आणि मकरंद शशिमधू माने ही दोन नावं ठळकपणे समोर येतात. रोजच्या जगण्याचं प्रतिबिंब, समाजातील वास्तव, सोबत मानवी भावभावना आपल्या चित्रपटांमधून दाखवताना आपल्या मातीशी असलेली नाळ या दोघांनी कायम जपली. चित्रपटसृष्टीतील हे दोन मातब्बर दिग्दर्शक आता ‘बापल्योक’ या मराठी चित्रपटासाठी एकत्र … Read more

हृदयी प्रीत जागते या मालिकेनंतर सिद्धार्थ खिरीड झळकणार ‘राणी मी होणार’ या सोनी टीव्ही वरील मालिकेत!

अभिनेता सिद्धार्थ खिरीड एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने त्याच्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तो अनेक मालिकांमधून वेगवेगळे पात्र साकारत असतो. त्याची हृदयी प्रीत जागते या मालिकेने काही दिवसांपूर्वी निरोप घेतला आहे. आता त्याची ‘राणी मी होणार’ ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राणी मी होणार मालिका 21 ऑगस्टपासून सोम ते शनि रात्री … Read more