Bigg Boss Update : सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिझनची (Bigg Boss Marathi Season 5) जोरदार चर्चा सुरू आहे. या शोच्या पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. प्रत्येक आठवड्याला काही ना काही नवे ट्विस्ट आणि टर्न्स प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. सध्या तिसरा आठवडा सुरू असून, स्पर्धकांमधील तणाव आणखी तीव्र होत आहे. अशा परिस्थितीत, मराठी बिग बॉसच्या या पर्वावर सगळ्यांचं लक्ष असतानाच, हिंदी बिग बॉसच्या १८व्या पर्वाची (Bigg Boss 18) चर्चा सुद्धा रंगली आहे.
सलमान खानच्या होस्टिंगखालील हिंदी ‘बिग बॉस’ प्रत्येक सीझनमध्ये काहीतरी वेगळं घेऊन येतो, आणि यंदाचं १८वं पर्वही त्याला अपवाद नाही. ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाच्या समाप्तीनंतर, आता ‘बिग बॉस १८’ ची तयारी जोरात सुरू आहे, आणि त्याबाबत विविध बातम्या आणि अफवा देखील पसरल्या आहेत. काही दिवसांपूर्वी असं वृत्त आलं होतं की, यंदा सलमान खानसह अब्दू रोजिकदेखील ‘बिग बॉस १८’ होस्ट करणार आहे. याचबरोबर, या सीझनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नावंही समोर येऊ लागली आहेत.
Bigg Boss Marathi Suraj Chavhan : ट्रॉफी तर मीच घेऊन जाणार, आणि खंडोबाला जाणार! सुरजच ठरलं..
या चर्चेत आता ‘आई कुठे काय करते’ या गाजलेल्या मालिकेतील एका प्रमुख अभिनेत्रीचं नाव पुढे आलं आहे, ज्यामुळे या शोच्या चाहत्यांमध्ये अधिकच उत्सुकता वाढली आहे. यंदाच्या ‘बिग बॉस १८’ मध्ये, प्रसिद्ध युट्यूबर मिथिलेश पटनाकर, आकृति नेगी, जसवंत बोपन्ना, दिग्विजय राठी, सीवेट तोमर, शाइनी आहुजा, पायल मलिक, कृतिका मलिक, अर्जुन बिजलानी, करण पटेल, समीरा रेड्डी, सुरभि ज्योति, पूजा शर्मा, शोएब इब्राहिम, दलजीत कौर, आणि इशा कोपिकर या नामांकित व्यक्तींना सहभागी होण्यासाठी विचारणा करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. याच यादीत ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्रीचं नावही समाविष्ट झालं आहे.
Bigg Boss Marathi 5 Update : मालवणी महाराष्ट्राची भाषा नाही! अरबाज जा अजब दावा!
‘आई कुठे काय करते’ ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले हिला ‘बिग बॉस १८’ साठी विचारणा करण्यात आली आहे, असं समजतंय. ‘राजश्री मराठी’च्या खात्रीशीर सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे. मात्र, अद्याप रुपाली भोसलेने याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
Namrta Pradhan New Serial : ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील ही अभिनेत्री करतेय ही नवीन मालिका
याआधी रुपाली भोसलेने ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात भाग घेतला होता. त्या पर्वात तिच्या खेळाने अनेकांची मनं जिंकली होती. रुपाली टॉप-१० स्पर्धकांमध्ये समाविष्ट झाली होती आणि ती तब्बल ७० दिवस बिग बॉसच्या घरात राहून, घराबाहेर पडली होती.
रुपालीच्या चाहत्यांना आता तिच्या हिंदी बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची बातमी ऐकून आनंद झाला आहे, परंतु तिच्या या निर्णयाबाबत अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. जर ती ‘बिग बॉस १८’ मध्ये सहभागी झाली, तर तिचं पुनरागमन प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्साहवर्धक ठरेल. आणि त्यातून बिग बॉसच्या घरात आणखी काही रोचक क्षणांची भर पडेल.
Bigg Boss Marathi 5 Purushottam Patil : मला बिग बॉसच्या घरात अजून एक आठवडा संधी भेटली पाहिजे होती..
हिंदी बिग बॉसचा हा नवा सीझन कसा असेल, कोणत्या स्पर्धकांची धडाकेबाज एन्ट्री होईल, आणि कोणते नवे वाद निर्माण होतील, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. परंतु, एक गोष्ट निश्चित आहे, की बिग बॉसचा हा शो नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करतो, आणि यंदाच्या सीझनमध्येसुद्धा असंच काहीसं होण्याची शक्यता आहे.