Bigg Boss Marathi Nikki Tamboli : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिझनमध्ये रंगलेल्या एका वादाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. निक्की तांबोळी, जी या शोमध्ये आपले स्पष्ट बोलणे आणि बेधडक वागणुकीसाठी ओळखली जाते, तिने पुन्हा एकदा घरातील सदस्यांमध्ये वाद निर्माण केला आहे. या वेळी वादाचे कारण ठरले वर्षा उसगावंकर यांच्याबाबत केलेले वक्तव्य, ज्यामुळे निक्कीला घरातील सदस्य आणि प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
बिग बॉस च्या घरात वादाची सुरुवात इथून झाली
‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या आठवड्यात घरातील सदस्यांसाठी एक अनोखा टास्क देण्यात आला होता. या टास्कमध्ये सदस्यांना दोन छोट्या पाहुण्यांची, म्हणजेच बाळाच्या बाहुल्यांची, काळजी घ्यायची होती. या टास्कदरम्यान दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा झाला. टास्कमधील स्पर्धा एवढी तीव्र झाली की बाळाच्या बाहुल्यांचेच हाल होऊ लागले. या गोंधळात, निक्कीने समोरच्या टीमच्या बाहुलीचा एक पाय तोडला. यावर वर्षा उसगावंकर, ज्यांनी नेहमीच शांत आणि संयमी दृष्टिकोन ठेवला आहे, त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “निक्कीने बाहुलीची मुंडी काय, तंगडं तोडलं.”
Bigg Boss Update : आई कुठे काय करते मधील ही अभिनेत्री जाणार बिग बॉस मध्ये!
निक्कीचं वर्षा ताईंबद्दल विवादास्पद वक्तव्य!
वर्षा उसगावंकर यांच्या या विधानावर निक्कीने प्रतिक्रिया देताना अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले. ती म्हणाली, “यांच्या भावना बघितल्या का? आईचं प्रेम कसं समजेल जाऊदेत…” हे वक्तव्य ऐकताच घरातील इतर सदस्य, विशेषत: अंकिता, निक्कीवर संतापल्या. अंकिताने निक्कीला खडसावत म्हटले, “तुझं हे बोलणं अतिशय चुकीचं आहे. बिग बॉस म्हणाले होते की, हा मानवी भावनांचा खेळ आहे. मॅमना तू जे बोललीस, ते सहन होणार नाही. त्यांच्या मातृत्वावर जाऊ नकोस. निक्की तू चुकीचं बोलतेस.”
Bigg Boss Marathi Suraj Chavhan : ट्रॉफी तर मीच घेऊन जाणार, आणि खंडोबाला जाणार! सुरजच ठरलं..
निक्की ला तिची चूक कळाली.
आपलं वक्तव्य चुकीचं असल्याची जाणीव झाल्यानंतर, दुसऱ्या दिवशी सकाळी निक्कीने किचनमध्ये वर्षा उसगावंकर यांची माफी मागितली. ती म्हणाली, “तुमच्याशी कसं बोलू मला कळत नव्हतं…मला वाईट वाटत होतं. पण जे काही आईपणाबद्दल बोलले, त्यासाठी मनापासून माफी मागते.” यावर वर्षा उसगावंकर यांनी माफ करताना म्हटलं, “तू बोललीस ते अक्षम्य आहे, पण ठीक आहे.”
प्रेक्षक निक्कीवर चांगलेच संतापले आहेत
निक्कीच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने संताप व्यक्त करत म्हटले, “वर्षा उसगावंकर यांच्या मातृत्वाबद्दल बोलणे अयोग्य आहे. त्या आई होऊ शकल्या नाहीत, पण हे live screen समोर बोलणं अत्यंत चुकीचं आहे.” दुसऱ्या एका युजरने निक्कीवर टीका करत विचारले, “त्या निक्कीला कळतं का काय बोलतेय ती? ती दुसऱ्याच्या लायकीबद्दल बोलते, पण तिला हा अधिकार कोणी दिला?” आणखी एका युजरने निक्कीवर टीका करत म्हटले की, “मानवी भावनांचा आदर टीम A कडून अजिबात केला गेला नाही. इतरांच्या खासगी आयुष्यावर बोलणे फार चुकीचे आहे.”
Bigg Boss Marathi 5 Update : मालवणी महाराष्ट्राची भाषा नाही! अरबाज जा अजब दावा!
निक्कीची अरेरावी घरात चालूच आहे.
अंकिताच्या या वक्तव्यावर निक्कीने अरेरावीपणा दाखवत उत्तर दिले, “हे तू मला सांगू नकोस…या स्वत:च तंगडं तोडलं म्हणाल्या आणि मला भावनांबद्दल सांगतात.” निक्कीच्या या वागण्यावर वर्षा उसगावंकर म्हणाल्या, “तू जे केलंय तेच मी सांगितलं… शब्द हे बाणासारखे असतात आणि ते परत घेता येत नाहीत एवढं लक्षात ठेव निक्की, एकदा बाण गेला की गेला.”
‘बिग बॉस मराठी’च्या घरात घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले की, हा शो केवळ खेळ, स्पर्धा आणि मनोरंजनापुरता मर्यादित नसून, तो मानवी भावनांचा देखील एक मोठा भाग आहे. निक्की तांबोळीने केलेले वक्तव्य हे अनेकांच्या भावना दुखावणारे होते, आणि त्याचा तिला मोठा फटका बसला. तिची माफी स्वीकारली असली तरी, हा वाद काही काळ प्रेक्षकांच्या मनात राहील, आणि त्यातून काही शिकण्यासारखे आहे. ‘बिग बॉस’च्या घरात सदस्यांनी त्यांच्या शब्दांची आणि कृतीची काळजी घ्यावी लागते, कारण शब्द बाणासारखेच असतात, एकदा सोडले की परत घेता येत नाहीत.