Bigg Boss Marathi 5 Winner : बिग बॉस मराठीचा विनर ठरलेला आहे ! हा घ्या पुरावा…‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाने यंदा प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले, मात्र यावेळी हा शो आपल्या पूर्वीच्या पर्वांपेक्षा लवकर संपणार आहे. या पर्वाची समाप्ती १०० दिवसांच्या नियोजित कालावधीच्या ऐवजी अवघ्या ७० दिवसांत होणार आहे. या निर्णयाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असला तरी, या शोने यंदा प्रचंड लोकप्रियता मिळवली.
दरम्यान, बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या ग्रँड फिनालेबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रेक्षकांना विजेत्याबाबत नवनवीन अंदाज बांधताना दिसत आहेत. अशातच, या शोच्या विजेत्याबद्दलचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या फोटोतून अंदाज लावला जात आहे की, कोणता स्पर्धक या पर्वाचा विजेता ठरणार आहे.
बिग बॉसच्या घरातून आतापर्यंत अनेक स्पर्धक बाहेर पडले आहेत. पुरुषोत्तमदादा पाटील, योगिता चव्हाण, निखिल दामले, इरिना रुडाकोवा, आर्या जाधव, छोटा पुढारी घनश्याम दरोडे, वैभव चव्हाण, वाइल्ड कार्ड स्पर्धक संग्राम चौगुले आणि अरबाज पटेल हे स्पर्धक शोमधून बाहेर पडले आहेत. सध्या घरात आठ सदस्य शिल्लक आहेत, त्यात वर्षा उसगांवकर, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, पंढरीनाथ कांबळे, धनंजय पोवार आणि अभिजीत सावंत यांचा समावेश आहे.
Bigg Boss Marathi 5 Winner :बिग बॉस मराठी बंद होण्यामागच कारण हे आहे !विनर सुद्धा ठरला आहे ..!
या आठ सदस्यांमधून कोणता स्पर्धक विजेता ठरणार, याबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. एका व्हायरल फोटोच्या आधारे काही अंदाज बांधले जात आहेत. या फोटोत दर्शविल्यानुसार, वर्षा उसगांवकर, पंढरीनाथ कांबळे आणि धनंजय पोवार यांचे एलिमिनेशन होणार आहे. त्यानंतर निक्की तांबोळी चौथ्या क्रमांकाची रनर-अप ठरेल, जान्हवी किल्लेकर तिसऱ्या क्रमांकाची रनर-अप ठरेल, तर सूरज चव्हाण दुसऱ्या क्रमांकावर असेल. यामुळे अंतिम स्पर्धा अंकिता वालावलकर आणि अभिजीत सावंत यांच्यात होईल. आणि या फोटोतून असा दावा केला जात आहे की, गायक अभिजीत सावंत हा यंदाच्या पर्वाचा विजेता ठरेल.
या व्हायरल फोटोत असंही दिसतंय की, ६३ व्या दिवशी डबल एविक्शन होणार आहे, ज्यात वर्षा उसगांवकर आणि पंढरीनाथ कांबळे बाहेर पडतील. त्यानंतर ६८ व्या दिवशी धनंजय पोवार एलिमिनेट होईल. शेवटी टॉप पाच स्पर्धकांमध्ये निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर आणि अभिजीत सावंत हे असतील. आणि त्यापैकी अभिजीत सावंत विजेतेपदावर आपले नाव कोरेल.
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मात्र, या फोटोनंतर शोचा विजेता आधीच ठरल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांमुळे प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे, आणि या चर्चांचे पडसाद सोशल मीडियावर उमटत आहेत. यंदाचा विजेता कोण असेल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, सर्वजण ६ ऑक्टोबरच्या फिनालेची आतुरतेने वाट पाहत आहेत.