Bigg Boss Marathi 5 Wild Card Entry : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची चर्चा आता महाराष्ट्रभर पसरली आहे. पहिल्या दिवसापासूनच या रिअॅलिटी शोने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे. अल्पावधीतच या कार्यक्रमाने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. दरम्यान, जसजसे दिवस पुढे जात आहेत, तसतशी बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमध्ये तणाव वाढताना दिसत आहे. घरातील सदस्यांमध्ये सुरु असलेली भांडणं, वादविवाद, रुसवेफुगवे, आणि त्यातून निर्माण होणारी नवी समीकरणं हे प्रेक्षकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. या सगळ्यात अरबाज आणि निक्की यांच्या केमिस्ट्रीची देखील बरीच चर्चा आहे.
आता बिग बॉसचा सहावा आठवडा सुरू होणार आहे, आणि त्याआधीच प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे – वाईल्ड कार्ड एंट्री कधी होणार? बिग बॉसच्या घरात नेहमीच वाईल्ड कार्ड एंट्रीने एक नवा ट्विस्ट येतो, त्यामुळे यंदा कोण नवा सदस्य घरात येणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. नुकताच चौथ्या आठवड्यात एलिमिनेशन राउंडमध्ये इरिना रुडाकोव्हा घराबाहेर पडली. त्यामुळे आणखी एक जागा रिकामी झाली आहे. आता या रिकाम्या जागेवर कोणता नवा स्पर्धक येईल, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

बिग बॉस मराठीचं यंदाचं पर्व अनेक दृष्टींनी अनोखं आहे. या शोच्या चाहत्यांमध्ये एकच चर्चा रंगली आहे – वाईल्ड कार्ड एंट्रीसाठी कोणता भन्नाट व्यक्तिमत्व निवडले जाईल? नेटकऱ्यांच्या चर्चांमध्ये अनेक संभाव्य नावं पुढे येत आहेत, आणि त्यातल्या त्यात एका नावाची सर्वाधिक चर्चा होत आहे.
Bigg Boss Marathi 5 update : बिग बॉस मराठी च्या घरात अरबाज आणि निक्कीची चुम्मा…घरात हे अलाउड आहे का?
बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांची चर्चा सोशल मीडियावरही जोरात सुरू आहे. अनेक लोकप्रिय कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना सपोर्ट करताना दिसत आहेत. कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोवर अनेक कलाकार प्रोत्साहन देणाऱ्या कमेंट्स करत आहेत. अशाच एका कलाकाराचं नाव सध्या चर्चेत आहे, आणि तो कलाकार म्हणजे प्रसिद्ध कोरिओग्राफर वैभव घुगे.
वैभव घुगेने केलेल्या कमेंट्स सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. तो सूरज चव्हाणला सपोर्ट करताना दिसतो, ज्यामुळे त्याच्या एंट्रीबद्दलच्या चर्चांना अधिकच जोर आला आहे. अनेकांना असा प्रश्न पडला आहे की, वैभव घुगे बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन येणार तर नाही ना? त्याच्या कमेंट्सवर नेटकऱ्यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसादही त्याच्या एंट्रीबद्दलच्या शक्यतेला अधिक बळकट करतो.
फक्त वैभव घुगेच नव्हे, तर अभिजीत बिचुकलेचं नावही वाईल्ड कार्ड एंट्रीसाठी चर्चेत आहे. या दोघांच्या एंट्रीबाबत प्रचंड चर्चा असून, त्यांच्यासोबत राखी सावंत आणि हास्यजत्रेतील काही लोकप्रिय कलाकारांची नावंही चर्चेत आहेत. त्यामुळे, कोणतं व्यक्तिमत्व बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री घेणार, याबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
Bigg Boss Marathi 5 News : डी पी दादाने लावली आग? निक्कीला भडकवलं..
बिग बॉस मराठीचा हा सीझन अनोखा आहे, आणि त्यातल्या वाईल्ड कार्ड एंट्रीचा इफेक्ट कसा असेल, हे पाहणं अत्यंत रोचक ठरणार आहे. कोणत्याही वाईल्ड कार्ड एंट्रीमुळे घरातील वातावरण अचानक बदलतं, स्पर्धकांची समीकरणं बदलतात, आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनात भर पडते. त्यामुळे, प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे, आणि सगळेच जण या वाईल्ड कार्ड एंट्रीसाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.