Bigg Boss Marathi 5 update : अस काय झाल की घरातल्या सगळ्यांनीअभिजित ला मारला सॅल्युट, निक्की पाडणार एकटी!

Bigg Boss Marathi 5 update : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिझनमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरातील सदस्यांमध्ये काही नवीन समीकरणे तयार होताना दिसत आहेत. या नव्या समीकरणांमध्ये निक्की तांबोळी मात्र एकटी पडताना दिसत आहे. घरातील सगळे सदस्य तिच्या विरोधात गेलेले दिसत आहेत. अशा परिस्थितीत अरबाज पटेल हा निक्की आणि अभिजीत सावंत यांच्या मैत्रीवर पझेसिव्ह होताना दिसत आहे. याच वेळी, अभिजीतवरही त्याच्या गटातील बी टीमकडून निक्कीसोबतच्या मैत्रीमुळे टीका होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Abhijit and nikki tamboli
Abhijit and nikki tamboli

या सगळ्या घडामोडींमध्ये अभिजीत सावंतने घेतलेल्या एका निर्णयामुळे घरातील सगळेच सदस्य त्याला सॅल्यूट करताना दिसतील. अभिजीतच्या या निर्णयाचा ‘बिग बॉस’च्या घरात काय परिणाम होईल, हे आगामी एपिसोड्समध्ये दिसून येईल. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कधी काय घडेल, हे सांगणे कठीण असते. रोजच घरातील सदस्यांमध्ये नवनवीन संघर्ष आणि तणाव पाहायला मिळतात. आजच्या एपिसोडमध्येही काहीतरी तसंच घडण्याची शक्यता आहे.

आजचा टास्क घरातील सर्व सदस्यांना पाताळलोकात सोन्याची नाणी शोधण्यासाठी पाठवणार आहे. टीम ए आणि टीम बी अशा दोन गटांमध्ये हा टास्क पार पडणार आहे. या टास्कमध्ये कोण कोणावर भारी पडणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले आहे.

Bigg Boss Marathi Nomination : या आठवड्यात हा सदस्य जाईल घराबाहेर! आत्ताच ठरलं..

या टास्कमध्ये बिग बॉसने सदस्यांना बीबी करन्सी मिळवण्यासाठी पाताळलोकात सोन्याची नाणी शोधण्यास सांगितले आहे. ही सोन्याची नाणी मिळवण्यासाठी दोन्ही गटांमध्ये जोरदार वादावादी होणार आहे. बिग बॉसच्या प्रोमोमध्ये दाखवले गेले आहे की, अरबाज आर्याला म्हणतो, “आर्या, आपले कमी (सोन्याची नाणी) आहेत… लवकर नाणी आण.”

दरम्यान, घराची कॅप्टन निक्की तांबोळी मात्र टीम बीने जमा केलेली नाणी वैध नाहीत, असे सांगते. या वक्तव्यावर डीपी दादा आक्रमक होतात आणि म्हणतात, “खायला अन्न मिळणार आहे त्या करन्सीवर.” त्याच्या पुढे अभिजीत सावंत म्हणतो, “यापुढे मला पार्टनर बनायचं नाही.”

Varsha Usgaonkar : वर्षा उसगांवकर यांना 24 वर्षानंतरही मुलबाळ नाही, कारण अभिनेत्रीने..

अभिजीतच्या या निर्णयावर घरातील इतर सदस्य त्याचे कौतुक करत त्याला सॅल्यूट करताना दिसतात. अभिजीत आणि निक्कीची पूर्वी एक जोडी होती. परंतु आता अभिजीतला निक्कीचा खेळ पटत नसल्याने त्याने तिला साथ सोडल्याचे दिसून येत आहे.

आता नेमकं टास्क दरम्यान काय घडेल, अभिजीतने निक्कीसोबत जोडी तोडल्याने बिग बॉस त्याला काही शिक्षा देतील का, आणि अभिजीतने साथ सोडल्याने निक्की घरात एकटी पडणार का, हे सर्व आजच्या एपिसोडमध्ये उघड होईल. ‘बिग बॉस मराठी’च्या या सीझनमध्ये या नव्या वळणामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनात आणखी भर पडणार आहे.

आणखी वाचा :

Pushkar Jog on Arbaj : अरबाज पटेल ला मराठी अभिनेता म्हणाला ‘ केकटणारा मर्द..’

Bigg Boss Marathi 5 Suraj Chavhan : सूरज जिंकला तर मी बिग बॉस बघणं सोडून देईन, अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य!

Leave a Comment