Bigg Boss Marathi 5 Update : ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi 5)सध्या प्रचंड चर्चेत आहे, आणि या रिअॅलिटी शोच्या तिसऱ्या आठवड्यात प्रेक्षकांना आणखी एका नवीन ट्विस्टने मनोरंजन दिलं आहे. या आठवड्यात घरात दोन नव्या छोट्या पाहुण्यांनी प्रवेश केला आहे, आणि ते पाहुणे म्हणजे बाहुल्यांरुपी बाळं! या बाळांची विशेषता म्हणजे त्यांची काळजी घेण्यासाठी घरातील स्पर्धकांची दोन टीम्समध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक टीमला अधिकाधिक बीबी करन्सी मिळवण्यासाठी या टास्कमध्ये जिंकणं गरजेचं आहे, आणि यासाठी आर्या आणि वैभव च्या नेतृत्वाखालील दोन्ही टीम्स आपापल्या परीने जीव ओतून प्रयत्न करत आहेत.
‘बिग बॉस’ने या टास्कसाठी काही कडक नियम घालून दिले आहेत. हे नियम पाळणं प्रत्येक सदस्यासाठी अनिवार्य असेल . टास्कदरम्यान बाळं सतत सदस्यांच्या हातात असायला हवीत, त्यांना रडायची वेळ येऊ नये, आणि बाळाचा रडण्याचा आवाज आला तर त्या टीममधील एका सदस्याने ताबडतोब स्विमिंग पूलमध्ये उडी मारायची. यानंतर बाळाचा लंगोट बदलावा लागतो. बाळांना भूक लागल्यावर, टीममधील एका सदस्याने त्यांच्यासाठी दिलेलं जेवण स्वत: खाऊन संपवायचं असतं. या सगळ्या नियमांच्या अधीन राहून खेळताना बाळ ज्या सदस्याच्या हातात आहे, त्याने फक्त मराठी भाषेतच संवाद साधायचा आहे; अन्य कोणत्याही भाषेचा वापर करणं नियमांच्या विरोधात आहे.
Bigg Boss Marathi 5 Purushottam Patil : मला बिग बॉसच्या घरात अजून एक आठवडा संधी भेटली पाहिजे होती..
टास्क सुरू झाल्यावर, अंकिता आपल्या हातातल्या बाळाशी मालवणी भाषेत बोलत होती. विरुद्ध टीमचा संचालक वैभवने हे पाहून लगेचच नियमभंग केल्याचं सांगून अंकिताच्या टीमचे पाच हजार बीबी करन्सी कापले. या निर्णयावर अंकिता अस्वस्थ झाली आणि तिने वैभवला विचारलं, “मी तुला आधीच विचारलं होतं, मालवणी चालेल की नाही?” यावर वैभव म्हणाला, “बिग बॉसने फक्त मराठी भाषेचा वापर करायला सांगितलं आहे.” याच विषयावर अरबाजने अधिक वादग्रस्त वक्तव्य केलं की, “मालवणी ही मराठी भाषा नाही… ती नॉन महाराष्ट्रीयन भाषा आहे.” या वक्तव्याने अंकिता संतापली आणि तिने ठामपणे सांगितलं की मालवणी ही मराठीची उपभाषा आहे. पण तिच्या बोलण्याकडे अरबाज, वैभव, निक्की, जान्हवी यांच्यापैकी कुणीच लक्ष दिलं नाही. त्यांच्या या वागण्याने अंकिता अस्वस्थ झाली, आणि त्यामुळे घरात दोन्ही टीम्समध्ये तणाव वाढला.
बिग बॉसच्या घरातील या प्रकरणामुळे सोशल मीडिया वर राडा!
या प्रकरणामुळे आता घराबाहेर सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया देत मालवणी भाषेचा अपमान झाला असल्याचं मत मांडलं आहे. “मालवणी भाषेला अरबाज नॉन महाराष्ट्रीयन भाषा म्हणाला…हा अपमान आहे,” “हे ४ जोकर आता घराबाहेर आले पाहिजेत,” “वैभव फक्त चमचेगिरीच करू शकतो,” “रितेश भाऊ यावरून नक्की काहीतरी बोला,” “मालवणी भाषेचा हा अपमान सहन होत नाही,” अशा तीव्र प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी कालच्या भागावर व्यक्त केल्या आहेत.
संपूर्ण प्रकरणामुळे निक्की आणि तिच्या टीमबद्दल सोशल मीडियावर नाराजीचा सूर पसरला आहे. प्रेक्षकांच्या मते, मालवणी भाषेला नॉन महाराष्ट्रीयन म्हणणं ही गोष्ट मुळातच चुकीची आहे, आणि या वक्तव्यामुळे शोमध्ये वादाला तोंड फुटलं आहे. या सर्व घटनाक्रमामुळे आता प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत की शोचे सूत्रसंचालक रितेश देशमुख या प्रकरणावर काहीतरी म्हणतील आणि या वादाचा योग्य तो निकाल लागेल.
Namrta Pradhan New Serial : ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील ही अभिनेत्री करतेय ही नवीन मालिका