Bigg Boss Marathi 5 Update : मित्रांनो बिग बॉस मराठी च्या नव्या सिझनचे ग्रँड प्रीमियर आपल्याला 26 जुलै रोजी 9:00 वाजता पाहायला मिळणार आहे. एका वर्षाच्या गॅप नंतर मराठी बिग बॉस पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या बिग बॉस मध्ये कोणकोणते कलाकार असणार याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
तुम्हाला तर माहीतच आहे की यावर्षी महेश मांजरेकर सर बिग बॉस मराठी चे सूत्रसंचालन करणार नाहीत, त्यांच्या जागी मराठमोळा बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख हा यावर्षी बिग बॉस मराठी चे सूत्रसंचालन करणार आहे. त्यामुळे रितेश देशमुखच्या नव्या अंदाजात सूत्रसंचालन पहायला खूपच मजा येईल.
पण मित्रांनो यावर्षीच्या बिग बॉस मध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे. तो बदल कोणता आहे, ते तर मी सांगणारच आहे, पण त्याआधी बिग बॉस मराठी च्या लेटेस्ट अपडेट साठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला देखील नक्की लाईक करा.
मित्रांनो यावर्षी बिग बॉस मराठी आपल्याला फक्त टीव्ही आणि टीव्हीच्या वेळेतच जियो सिनेमा वर देखील पाहायला मिळणार आहे. यावर्षी बिग बॉस मराठी चे कुठलेही स्पॉयलर तुम्हाला मिळणार नाहीत, कारण यावर्षी जिओ सिनेमावर बिग बॉस मराठी आपण लाईव्ह पाहू शकणार नाही.
जियो सिनेमा वर नुकताच एक प्रोमो आला आहे ज्यामध्ये रितेश देशमुख म्हणतो की यावेळेस तुम्हाला कोणताही स्पॉयलर मिळणार नाही. तुम्ही टीव्हीचा वेळेतच जिओ सिनेमा वर देखील बिग बॉस पाहू शकता. याचा अर्थ जिओ सिनेमा वरील बिग बॉस मराठीचे लाईव्ह बंद करण्यात येणार आहे.
गेल्यावर्षी बिग बॉस मराठी आणि हिंदी सीजन देखील आपण जिओ सिनेमा लाईव्ह पाहू शकत होतो. परंतु कदाचित लाईव्ह बिग बॉसमुळे प्रेक्षकांना एपिसोड पहायच्या आधीच खूप सारे अपडेट्स मिळत होते, त्यामुळे प्रेक्षक रात्रीचा एपिसोड पाहत नव्हते. खूप साऱ्या गोष्टी, टास्क, भांडण यांसारख्या गोष्टी एपिसोड च्या आधीच प्रेक्षकांना समजत होत्या. याच कारणामुळे कदाचित गेल्यावर्षी बिग बॉस मराठीचा टीआरपी देखील कमी झाला होता.
त्यामुळे यावर्षी आपल्याला जियो सिनेमा वर लाईव्ह बिग बॉस पाहता येणार नाही. तुम्हाला जर बिग बॉस पाहायचा असेल तर तो तुम्ही फक्त कलर्स मराठी चैनल वर 9:00 वाजता आणि जियो सिनेमा वर देखील 9:00 वाजता पाहू शकता. तर मित्रांनो तुम्ही लाइव बिग बॉस मराठी पाहत होता का? पाहत असाल तर तुम्हाला बिग बॉसचे लाइव बंद करण्याचा निर्णय तुम्हाला पटतोय का ते कमेंट्स करुन नक्की सांगा!
आणखी वाचा :