Bigg Boss Marathi 5 Paddy Kambale : अभिजित अरबाज सारखाच आहे, फक्त तो चेहऱ्यावर ते दिसू देत नाही – पंढरीनाथ (पॅडी)कांबळे

Bigg Boss Marathi 5 Paddy Kambale : ‘बिग बॉस मराठी’च्या नवव्या आठवड्यात घरातील सदस्य पंढरीनाथ कांबळेला (पॅडी) कमी मतं मिळाल्यामुळे घरातून बाहेर पडावं लागलं. तब्बल ६२ दिवस घरात राहिल्यानंतर पंढरीनाथचा हा प्रवास संपला. त्याच्या एक्झिटनंतर त्याने ‘बिग बॉस’च्या घरातील खेळाविषयी आणि तिथल्या इतर सदस्यांविषयी मोकळेपणाने आपली मतं मांडली. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने काही प्रमुख सदस्यांविषयी आपले विचार व्यक्त केले, विशेषतः अभिजीत सावंतविषयी त्याने स्पष्टपणे आपलं मत मांडल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Bigg Boss Marathi 5 Paddy Kamable
Bigg Boss Marathi 5 Paddy Kamable

मुलाखतीदरम्यान पंढरीनाथला विचारण्यात आलं की, “अभिजीत सावंत घरात वेगळा गेम खेळतो असं वाटतं का?” या प्रश्नाला उत्तर देताना पंढरीनाथ म्हणाला, “हो, नक्कीच. अभिजीतचा घरात वेगळाच खेळ आहे. सुरुवातीला तो आमच्या ग्रुपमध्ये होता आणि आम्ही एकत्र बसायचो, बोलायचो. त्याच्याविषयी माझ्या मनात खूप आदर होता. पण जसजसा वेळ पुढे गेला, तसतसं मी त्याला वेगवेगळ्या गोष्टी गेममध्ये करताना पाहिलं. तो काही गोष्टी सतत सारवासारव करत असायचा. आमच्या ग्रुपमध्ये असूनसुद्धा, त्याने तिकडे जाऊन निक्कीकडेही काही बोलायला सुरुवात केली.”

अभिजीत सावंतचं हे वागणं त्याच्या खेळाचा एक भाग असल्याचं पंढरीनाथला वाटत होतं. तो पुढे म्हणाला, “अभिजीत असा वागत होता की, उद्या जर नॉमिनेशनची वेळ आली, तर निक्की त्याला नॉमिनेट करू नये. म्हणूनच तो तिच्याशी असं वागायचा. सुरुवातीला मला त्याच्याविषयी आदर होता, पण नंतर मी त्याला त्याच्या या वागणुकीबद्दल बोलायला सुरुवात केली.”

Bigg Boss Marathi 5 Vaibhav Chavhan: वैभव चव्हाणच सूरज बद्दल धक्कादायक वक्तव्य.. म्हणाला सूरज.. चर्चेला उधाण

पंढरीनाथने आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे अंकिता वालावलकरने अभिजीतचं खरं रूप बाहेर आणायला सुरुवात केली आहे. त्याचं स्पष्टीकरण देताना तो म्हणाला, “जसा अरबाज घरात वागत होता, तसंच काहीसं अभिजीतही वागत आहे. बाथरूम स्वच्छ करणं, घराची साफसफाई करणं, अशा मोठ्या जबाबदाऱ्या काही सदस्य पार पाडत होते. पण निक्की या कामांमध्ये फारसा सहभाग घेत नव्हती. त्यामुळे त्यातून इतर सदस्यांना त्रास होत होता. हे दृश्य मी पहात होतो आणि मला अभिजीतचं वागणं अरबाजच्या वागण्याचं सॉफ्टर व्हर्जन असल्यासारखं वाटत होतं.”

Bigg Boss Marathi 5 Arbbaj and Nikki: अरबाज चा खरंच साखरपुडा झाला आहे का? अरबाज ने दिल निक्कीच्या आईला उत्तर..

पंढरीनाथने आपल्या मनातील आणखी काही विचार उघड केले. त्याने सांगितलं की, “अभिजीत सावंतच्या बाजूने उभं राहावं असं मला कधीच वाटलं नाही. कारण, मला त्याच्यावर नेहमीच मुखवटा असल्याचं जाणवलं. तो एक वेगळीच प्रतिमा निर्माण करत होता. हा मुखवटा अजूनही त्याच्या चेहऱ्यावर आहे, आणि कदाचित फिनालेनंतरच इतर लोकांना त्याचं खरं रूप कळेल.”

अभिजीत सावंतच्या संदर्भात पंढरीनाथने स्पष्ट मतं मांडल्यानंतर, आता इतर सदस्यांच्या खेळाकडे लक्ष केंद्रित केलं आहे. सध्या घरात सात सदस्य उरले आहेत: अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर, आणि जान्हवी किल्लेकर. या सात सदस्यांमध्ये कोण ‘बिग बॉस मराठी’चा विजेता ठरेल हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Bigg Boss Marathi 5 Ritesh Deshmukh: ‘भाऊच्या धक्क्या’वर जाणवली रितेश भाऊची कमतरता; अवघ्या महाराष्ट्राने केलं लाडक्या भावाला मिस!

घरात अभिजीतचा खेळ कसा आहे, त्याचे मुखवट्यामागचे खरे चेहरे कसे आहेत, याविषयी पंढरीनाथच्या या स्पष्ट मतांनी प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण झालं आहे. पुढे काय होईल आणि ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड फिनालेमध्ये कोण बाजी मारेन, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Leave a Comment