Bigg Boss Marathi 5 News : डी पी दादाने लावली आग? निक्कीला भडकवलं..

Bigg Boss Marathi 5 News : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिजनमध्ये आता चौथा आठवडा सुरू झाला आहे, आणि घरातल्या वातावरणातलं ताणतणाव वाढताना दिसत आहे. वीकेंडला ‘भाऊच्या धक्क्यावर’ रितेश देशमुखच्या ‘चक्रव्यूह’ मध्ये दाखवलेल्या व्हिडीओमुळे घरात एक वेगळंच तणावाचं वातावरण तयार झालं आहे. यामुळे घरातले सदस्य एकमेकांबद्दल काय विचार करतात, हे प्रेक्षकांसमोर आलंय.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Bigg Boss Marathi 5 News
Bigg Boss Marathi 5 News

या आठवड्यात धनंजय पोवार, ज्याला सगळे ‘डीपी दादा’ म्हणून ओळखतात, त्याचा निक्की तांबोळीशी झालेला संवाद चर्चेत आहे. या संवादात अंकिता वालावलकर आणि अभिजीत सावंतही होते. प्रोमोमध्ये दाखवलं आहे की, किचनमध्ये जेवण तयार करत असताना, डीपी दादा, निक्की, अभिजीत आणि अंकिता घन:श्यामबद्दल बोलत असतात. डीपी दादा निक्कीला सांगतो की, “तुमच्याकडे काही झालं की तो लगेच सांगतो, पण मला मात्र कोणी विचारत नाही.”

Abhijet Bichukale in Bigg Boss Marathi :बिग बॉस च्या घरात अभिजित बिचुकले ची होणार इंट्री! राडा होणार..

डीपी दादा पुढे घन:श्यामची नक्कल करताना असं म्हणतो, “योगिता घराबाहेर जाण्याआधी त्याने तिचा हात हातात घेऊन ‘आता ताई तुझ्याशिवाय मला कोण आहे,’ असं म्हणालं.” हे ऐकून निक्की आश्चर्याने “कायSSS” असं म्हणते. डीपी दादा पुढे सांगतो की, “मी योगिताकडे पाहिलं, तर ती म्हणाली, ‘मी कधी याला जवळ केलं, मी कधी याच्यावर माया दाखवली.’ आणि मी बाहेर गेल्यावर हा दरवाजात असेल, तर मी त्याला सटकन मारेल.”

Apurva Nemlekar on Bigg Boss Marathi : अपूर्वा नेमळेकर भडकली, चावडीवर यांची बोबडी वळायची, आणि आता फेम साथी फालतू प्रयत्न

यावर अभिजीत डीपीला दुरुस्ती करून सांगतो की, “योगिताने असं म्हटलं होतं की, ‘मी याला घेऊन जाईल.'”

या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’च्या घरात डबल एविक्शन झालं आहे. त्यामुळे निखिल दामले आणि योगिता चव्हाण यांचा प्रवास संपला आहे. या आठवड्यात निखिल, योगिता, अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण हे सदस्य नॉमिनेशनमध्ये होते, त्यामुळे त्यांच्यावर सतत टांगती तलवार होती. शेवटी, निखिल आणि योगिताला घर सोडावं लागलं.

सिजन जसजसा पुढे जातोय, तसतसे घरातल्या सदस्यांचे खरे रंग दिसायला लागले आहेत. पुढे काय होणार, कोणते नवीन ट्विस्ट्स येणार, हे पाहणं आता अधिकच रंजक ठरणार आहे.

Leave a Comment