Bigg Boss Marathi 5 Contestants: ही मराठी सोशल मीडिया स्टार असेल बिग बॉस मराठी 5 ची पहिली कंटेन्स्टंट!

Bigg Boss Marathi 5 Contestants: मागच्या वर्षी बिग बॉस मराठी हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही, त्यामुळे प्रेक्षक खूप नाराज होते. अशातच कलर्स मराठी ने बिग बॉस मराठी 5 चा टीज़र आणि तारीख घोषित केली आणि प्रेक्षक खूष झाले.

Bigg Boss Marathi 5 Contestants

कलर्स मराठी वर बिग बॉस मराठी 28 जुलै पासून सुरू होत आहे. या सीज़न मध्ये स्पर्धक कोण कोण असतील याची कमालीची उस्तुकता प्रेक्षकांमध्ये आहे. परंतु स्पर्धकांची नावे आणखी तरी कलर्स मराठी ने गुलदस्त्यात टेवली आहेत. अनेक स्पर्धकांच्या नावाच्या चर्चा सोशल मीडिया वर सुरु झाल्या आहेत.

यावेळेस चा बिग बॉस मराठी महेश मांजेरकर होस्ट करणार नाहीत अशी न्यूज़ आली आणि चाहत्यांना धक्का बसला, परंतु कलर्स मराठी ने रितेश देशमुख बिग बॉस मराठी चा सूत्रसंचालन करणार आहे अस सांगितल आणि प्रेक्षक खूश झाले.

रितेश देशमुख सूत्रसंचालन करणारं हे पाहिलं सरप्राईज होत , आणि या सीज़न मध्ये असे खूप सारे सरप्राईज मिळणार आहेत हे नक्की. आशातच एका स्पर्धकच्या नावाच्या चर्चा सोशल मीडिया वर खूप रंगल्या आहेत. हा स्पर्धक एक मराठी सोशल मीडिया स्टार आहे. हा स्पर्धक दुसरा तिसरा कोणी नसून कोकण हेर्टेड गर्ल म्हणून ओळखली जाणारी अंकिता वालावलकर आहे.

अंकिता सोशल मीडिया वर खूप चर्चेत असते. तिच इन्स्टाग्राम वर कोकण हेर्टेड गर्ल नावाने अकाऊंट आहे यावर तिचे तब्बल 550k एवढे फॉलोअर्स आहेत. आणि युट्यूब वरती ती तिचे व्लॉग अपलोड करत असते. यूट्यूब वर तिचे 265k एवढे सबस्क्रायबर्स आहेत.

अंकिताच  कोकणातल्या रिफायरी वरच भाष्य खूप वादाच ठरल. तिला या भाष्यामुळे ट्रोलिंग सुद्धा सहन करावी लागली. 

बिग बॉस मराठी मध्ये अंकिता असेल का? अश्या चर्चा सोशल मीडिया वर सुरु आहेत. अंकिता बिग बॉस मराठी च्या घरात जाणार की नाही हे तर 28 जुलै लाच स्पष्ठ होईल.

प्रत्येक आठवड्यात लागेल झटका आणि रंगणार मनोरंजनाचा धमाका! असा बिग बॉस मराठी चा सीज़न 5 लवकरच सुरु होणार आहे. 

आणखी वाचा :

Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीने या दोन मालिकांच्या पोटावर दिला पाय!

Tharal Tar Mag 12 June Episode : अर्जुन ने घेतला सायलीचा मुका, लागली प्रेमाची चाहूल..

Leave a Comment