Bigg Boss Marathi 5 Arbbaj and Nikki : ‘बिग बॉस मराठी ५’ सध्या ‘फॅमिली वीक स्पेशल’ टास्कच्या माध्यमातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या टास्कमध्ये स्पर्धकांना त्यांचे कुटुंबीय भेटण्यासाठी घरात येत आहेत. प्रत्येक स्पर्धकासाठी हा आठवडा भावनिक क्षणांनी भरलेला आहे, कारण त्यांना त्यांच्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधण्याची संधी मिळत आहे. आजच्या एपिसोडमध्ये स्पर्धक निक्की तांबोळीची आई प्रमिला तांबोळी घरात प्रवेश करणार आहेत. या भेटीदरम्यान घडणाऱ्या काही घटनांनी प्रेक्षकांच्या मनात मोठी उत्सुकता निर्माण केली आहे.
निक्की आणि तिच्या आईच्या भेटीचा एक प्रोमो कलर्स टीव्हीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये निक्की तांबोळी आणि तिच्या आईच्या संवादात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. प्रमिला तांबोळी, निक्कीच्या आई, त्या निक्कीला सांगताना दिसतात की, अरबाज पटेल याचा साखरपुडा झाला आहे आणि त्याने जे केलं ते योग्य नव्हतं. या गोष्टीने निक्कीचा धक्का बसतो आणि ती तातडीने प्रतिक्रिया देते की, “अरबाज आणि माझं जे काही होतं ते आता संपलं आहे.” यानंतर निक्की बिग बॉसच्या घरात अरबाजचे कपडे गोळा करते आणि बिग बॉसला सांगते की, “हे अरबाजचे कपडे आहेत, ते फेकून द्या.”
प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगू लागली की, खरंच अरबाजचा साखरपुडा झाला आहे का? यामुळे प्रेक्षकांमध्ये मोठी उलटसुलट चर्चा सुरु झाली. या सगळ्या चर्चांवर आता स्वतः अरबाज पटेलने प्रतिक्रिया दिली आहे. अरबाजने आपल्या इन्स्टाग्रामवरील ब्रॉडकास्ट चॅनलवर एक ऑडिओ क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने या प्रोमोबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. अरबाज म्हणतो, “मी नुकताच कलर्स टीव्हीवर ‘बिग बॉस’चा प्रोमो पाहिला. त्यामध्ये निक्कीच्या आईंनी सांगितलं की, लोक म्हणतायत की माझा साखरपुडा झाला आहे, पण असं काहीच झालेलं नाही. माझा साखरपुडा झालेला नाही, माझं लग्न झालेलं नाही. या सगळ्या अफवा आहेत. या खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत, पण यामध्ये कुठलाही तथ्य नाही. निक्कीला खरं काय ते माहीत नसल्यामुळे ती अशा प्रकारे प्रतिक्रिया देत आहे, आणि त्यामुळे तुम्ही लोक टेन्शन घेऊ नका. जर मला निक्कीशी भेटायची संधी मिळाली, तर मी तिला सर्व काही स्पष्ट सांगेन. ती समजून घेईल, अशी आशा आहे. पण नाही घेतलं तरी काही हरकत नाही. मात्र, हे सगळं फक्त अफवा आहेत, माझा साखरपुडा झालेला नाही.”
प्रोमोमध्ये प्रमिला तांबोळी स्पष्टपणे निक्कीला सांगताना दिसतात की, “अरबाज चुकीचा चाललाय, त्याने असं वागायला नको होतं. त्याची इंगेजमेंट झाली आहे.” यावर निक्की थक्क होते आणि प्रश्न विचारते, “कोणाची?” त्यावर प्रमिला उत्तर देतात, “अरबाजची.” हे ऐकताच निक्कीच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे आणि निराशेचे भाव उमटतात. ती तत्काळ अरबाजचे कपडे आणि त्याचे इतर सामान गोळा करते आणि बिग बॉसला सांगते की, “हे सामान बाहेर फेकून द्या.”
Bigg Boss Marathi 5 Winner : बिग बॉस मराठीचा विनर ठरलेला आहे ! हा घ्या पुरावा…
अरबाज पटेलने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करण्यापूर्वी, लीझा बिंद्रा ही त्याची गर्लफ्रेंड असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच, त्यांनी लवकरच लग्न करण्याची योजना आखल्याचेही सांगितले होते. परंतु ‘बिग बॉस’च्या घरात, निक्की आणि अरबाज यांच्यातील जवळीक आणि प्रेम वाढताना दिसले. अरबाजला घरातून बाहेर पडावे लागले तेव्हा निक्की खूप भावूक झाली होती आणि तिने त्याला संधी देण्याची विनवणी केली होती.
Bigg Boss Marathi 5 Winner :बिग बॉस मराठी बंद होण्यामागच कारण हे आहे !विनर सुद्धा ठरला आहे ..!
निक्कीच्या आईने केलेल्या खुलाशानंतर अरबाज आणि निक्कीच्या नात्यात काय घडामोडी होणार, हे प्रेक्षकांना उत्सुकतेने पाहायचे आहे. निक्की ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतरच या नात्याचा पुढील प्रवास काय असेल, हे स्पष्ट होईल. त्यामुळे या नात्याबाबतचा पुढील निर्णय प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण करत आहे.