बिग बॉस मराठी पर्व १ च्या विजेत्या अभिनेत्री मेघा धाडे यांनी घेतला भारतीय जनता पक्षात प्रवेश!

अभिनेत्री मेघा धाडे या लोकप्रिय अभिनेत्री आहेत . त्यांनी बिग बॉस मराठी १ चा किताब आपल्या नावी केला. अभिनेत्री मेघा धाडे यांना परिचयाची गरज नाही. त्यांनी त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी बऱ्याच चित्रपट, मालिका आणि रीयालिटी शो मध्ये काम केले आहे. बिग बॉस मराठीच्या यशानंतर मेघा बिग बॉस हिंदी १२ मध्ये सहभागी झाल्या होत्या . या रीयालिटी शो मध्ये त्यांची Wild Card एंट्री होती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

बरेच महाराष्ट्रियन कलाकार राजकारणात सक्रिय होतात. बरेच कलाकार वेगवेगळ्या आणि आपल्या आवडत्या पक्षामध्ये सहभागी होतात. अभिनय आणि राजकारण या दोन्हीही क्षेत्रात बरेच कलाकार काम करतात. भारतीय जनता पार्टी मध्ये बरेच कलाकार प्रवेश करतात. आता अभिनेत्री मेघा धाडेने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. १४ जूनला त्यांनी प्रवेश केला आहे. यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री विक्रांत पाटील, श्री विजय चौधरी व सांस्कृतिक प्रकोष्टच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्रीमती प्रिया बेर्डे यांच्या उपस्थित मेघा धाडे यांचा प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम पार पडला.

भारतीय जनता पार्टी मध्ये त्यांचा प्रवेश त्यांनी स्वतः इन्स्टाग्राम पेज वर याची माहिती दिली आहे.भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सांस्कृतिक प्रकोष्टच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्रीमती प्रिया बेर्डे यांचा आशीर्वाद घेऊन मेघा धाडे यांनी प्रवेश केला. सध्या सोशल मीडिया वर प्रियाताई बेर्डे आणि अभिनेत्री मेघा धाडे यांचे फोटो खूपच व्हायरल होत आहेत.

मेघा धाडे यांच्या चाहत्यांनी आणि बऱ्याच कलाकारांनी त्यांना पुढील वाटचालीस खुप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment