‘घाडगे अँन्ड सुन’ मालिका फेम अभिनेत्री भाग्यश्री लिमये हिच्या वडिलांच निधन झाले असुन ही बातमी तिने स्वतः सोशल मीडिया वरुन दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाग्यश्रीचे वडील बरेच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर सोलापूर येथे उपचारही सुरू होते. भाग्यश्री सोशल मीडियावर तिच्या आई बाबांन सोबतचे फोटो नेहमी पोस्ट करायची. त्यावरून तिच त्यांच्यासोबत असलेल बॉंडिंग दिसून येत. भाग्यश्रीच्या या पोस्ट वर अनेक कलाकारांनी कॉमेंट करून आम्ही तुझ्या दु:खात सहभागी आहोत अस म्हणून सांत्वन केले आहे.
भाग्यश्रीचे वडील म्हणजे माधव लिमये यांना A TO Z मराठी कडून भावपूर्ण श्रद्धांजलि .