“सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा”! ७ ऑक्टोबरपासून शनि – रवि रात्री ९. ०० वा. कलर्स मराठीवर!

संगीताचं खरं सौंदर्य म्हणजे ते कुठलीही मर्यादा न जुमानता लोकांना जोडत. संगीत न आवडणारा व्यक्ती या जगात शोधून देखील सापडणार नाही. संगीत प्रत्येकाच्या आयुष्यात नवचैतन्य आणत, उभारी आणत… संगीत म्हणजे ध्यास, निखळ आनंद. कोणत्याही कलेला आपण एखाद्या साच्यात बंदिस्त करून ठेऊ शकत नाही. अगदी तसंच गाण्याचं देखील आहे. कलर्स मराठीने प्रेक्षकांच्या भेटीस असा एक संगीतमय … Read more

‘रमा राघव’च्या नात्याला ‘निर्णायक वळण’ विशेष भाग – आज ३ आणि उद्या ४ ऑक्टोबर!

कलर्स मराठीवरील ‘रमा राघव’ या लोकप्रिय मालिकेचे दोन विशेष भाग आज ३ ऑक्टोबर आणि उद्या ४ ऑक्टोबरला रात्री नऊ वाजता प्रसारित होणार आहेत. ‘रमा राघव’ या मालिकेत रमा आणि राघवचे नाते एका निर्णायक वळणावर आले आहे. गणेशोत्सवा दरम्यान पुरोहित घरी राहायला आलेल्या परांजपेंच्या रमाचे,राघवसोबत असलेले नाते राघवची मामेबहीण अश्विनीमुळे उघड होते. अखेर गजानन पुरोहित गुरुजी … Read more

खरचं तिचं काय चुकलं ? मालिकेत गायत्री सोहम ही अभिनेत्री साकारणार नकारात्मक भूमिका!

सोनी मराठी वाहिनी नेहमी निरनिराळे विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. आता सोनी मराठी वाहिनी दोन नव्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. ‘खुमासदार नात्यांचा गोडा मसाला’ आणि ‘खरंच तिचं काय  चुकलं?’. हे विषय प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहेत. ‘खरंच तिचं काय चुकलं?’ या मालिकेत दोन सख्ख्या बहिणींची गोष्ट पाहायला मिळणार आहेत. भिन्नविभिन्न स्वभावांच्या या … Read more

दिल दोस्ती दिवानगी मध्ये विजय पाटकर आणि सुरेखा कुडची यांचा रोमॅंटिक अंदाज !

हिंदी-मराठी चित्रपटांमधून आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर आणि वेगवेगळ्या भूमिकांतून सर्वांची मन जिंकणाऱ्या अभिनेत्री सुरेखा कुडची या दोन मात्तब्बर कलाकारांचा रोमॅण्टीक अंदाज आगामी ‘दिल दोस्ती दिवानगी’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या दोघांची एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. चित्रपटात त्यांचा रोमॅण्टीक ट्रॅक असून या दोघांचं प्रेम कसं खुलतं? … Read more

आता राजकीय नेत्यांवरही शाहरूखच्या ‘जवान’चा प्रभाव! राजकीय साक्षरतेचे धडे देत असल्याचं निरीक्षण.

चित्रपट हे समाजाचं प्रतिबिंब असतं, असं नेहमीच म्हटलं जातं. मात्र बॉक्स ऑफिसवर विक्रमांचे मनोरे रचणाऱ्या शाहरूख खानचा ‘जवान’ हा चित्रपट ही उक्ती खरं करत असल्याचं दिसत आहे. जवान चित्रपटात शाहरूख खानच्या तोंडी असलेले काही संवाद राजकीय नेत्यांना प्रेरणा देत असल्याचं समोर आलं आहे. अनेक नेत्यांनी ‘जवान’मधील शाहरूखच्या तोंडी असलेल्या मतदारांच्या आवाहनाची तारीफ केली असून त्याचे … Read more

झी मराठीवरील दार उघड बये मालिका ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेणार प्रेक्षकांचा निरोप!

मराठी मनोरंजन विश्वात नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात, तर काही मालिका निरोपही घेतात. चांगले कथानक असून देखील मालिका लवकरच निरोप घेतात, याची खंत देखील प्रेक्षकांना असते. आता झी मराठीवरील सर्वांची आवडती मालिका दार उघड बये लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका माहितीनुसार ७ ऑक्टोबरला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी झी मराठीवरील २ … Read more

१ ऑक्टोबरला रंगणार अक्षरा व अधिपतीचा दिमाखदार भव्य विवाह सोहळा !

प्रेक्षकांनी झी मराठीच्या सोशल मीडिया पेज वर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ह्या मालिकेचा १ ऑक्टोबरला होणाऱ्या विशेष भागाचा प्रोमो बघितलाच असेल. कुटुंबाचा मान राखण्यासाठी अक्षरा अधिपतीसोबत लग्नासाठी तयार होते. दुसरीकडे भुवनेश्वरी खुश आहे कारण अक्षराला अद्दल घडवण्यासाठीच हा सगळा घाट घातला आहे. लग्नातच इरा खोट बोलल्याचं अक्षराला कळणार आहे आणि अक्षराला याचा खूप मोठा धक्का … Read more

‘टायगरला मी चित्रपटाचा शौकीन म्हणून पाहिल्याप्रमाणे चित्रित करायचे होते!’ : मनीष शर्मा

यशराज फिल्म्सने काल टायगर का मेसेज रिलीज केला, हा व्हिडिओ टायगर 3 च्या ट्रेलरचा अग्रदूत आहे आणि तो इंटरनेटवर त्वरित ब्लॉकबस्टर ठरला! चित्रपटाच्या प्रमोशनल मोहिमेची सुरुवात करणाऱ्या या व्हिडिओच्या यशाबद्दल दिग्दर्शक मनीश शर्मा रोमांचित आहेत. ते म्हणतात, “गेल्या दशकात टायगर कदाचित बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित व्यक्तिरेखा बनला आहे. आणि त्याच्या कथेला पुढे नेण्याची, जबाबदारी हाती घेण्याची … Read more

स्वप्न खरी होतात .. असे कॅप्शन लिहीत अभिनेत्री धनश्री काडगावकरने खरेदी केले स्वतःचे नवे घर!

मराठी सिनेसृष्टीत गेल्या काही महिन्यांपूर्वी बऱ्याच कलाकारांनी स्वतःचे फार्महाऊस तर कोणी घर विकत घेतले आहे. स्वतःचे घर खरेदी करणे हे सर्वांचे स्वप्न असते. आता एका अभिनेत्रीने मुंबईमध्ये स्वतःचे घर खरेदी केले आहे. अभिनेत्री धनश्री काडगावकरने स्वतःचे घर घेतले आहे. याची माहिती स्वतः धनश्रीने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. सई ताम्हणकर, राधा सागर, मीरा जोशी, स्मिता शेवाळे … Read more

काव्या आणि आशुचे कट कारस्थान काव्याला समजले!

काव्याला हॉस्पिटल मधून फ़ोन येतो तेव्हा तिला जे खरं आहे ते कळतं. काव्या आणि आशुचे कट कारस्थान काव्याला समजले आहे. तेव्हा काव्य आई आणि आशुला खडेबोल सुनावते.