स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. यातील सगळेच पात्र प्रेक्षकांना आवडत आहेत. नकारात्मक भूमिका साकारणारे पात्र देखील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहेत. या मालिकेतील अनघाचे पात्र साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची आवडती बनली आहे.
नुकताच स्टार प्रवाह वहिनीचा पुरस्कार सोहळा पार पडला. त्यात अश्विनीने अनघा या भूमिकेचे काही अनुभव शेअर केले. या भूमिकेबद्दल अश्विनी म्हणाली की, अनघा समाजातील अशा मुलींचा चेहरा आहे ज्या मुली घटस्पोटित आहे. डिप्रेशनमध्ये आहेत. त्यांनंतर त्यांना पुन्हा लग्न करण्याची संधी येते. त्यावेळेला स्वतःला शांत करून एक नविन कुटुंबात समाविष्ट होणं या सगळ्या गोष्टी अनघाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आल्या आहेत.
दुख: येत राहतात परंतु त्यामुळे जगण थांबत नाही हेच सांगण्याचे काम अनघाने केले आहे. यापुढे अश्विनी म्हणाली की, जसं अनघाच्या आयुष्यात चढ उतार आले तसच माझ्याही आयुष्यात खुप दुख: आले . माझे बाबा मला सोडून गेले तेव्हा माझ्यावर दुखा:चा डोंगर कोसळला होता. माझ्या बाबांनी मला नेहमी एक गोष्ट सांगितली की आपण नेहमी कलाक्षेत्रात स्वतःला वाहून न्यावे. जर मी आज हे केले नसते तर मी नक्कीच डिप्रेशन मध्ये गेले असते. पुढे ती म्हणाली, तुम्ही जितके कामात असाल तितके गुंतून राहता आणि वाईट विचार तुमच्यापासून दूर होतात.
तर तुम्हाला अनघाची भूमिका आवडते का ? हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.