स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते या मालिकेतील अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे हिचे वडील प्रदीपकुमार महांगडे यांचे करोना मुळे निधन झाले. हेच दुख: व्यक्त करत अश्विनीने इनस्टाग्राम वर एक दुख्:द पोस्ट शेअर केली आहे . ज्यात तिने म्हंटल आहे, “करोनाने घात केला ,माझा आधारवड हरपला . कधी कधी स्वत:चे फाटलेले असले तरी शेवटपर्यंत लोकांसाठी करीत राहिले व मलाही तेच शिकवले. गेले १५ दिवस वाघासारखे करोनाशी लढले पण अखेरीस ही झुंज उपयशी ठरली. काळाने घाला घातला व आम्हाला पोरके केले. काल जाता जाता एक सांगून गेले, समाजासाठी काही केले नाही तर आपले आयुष्य निरर्थक . नाना माझ्या यशाचं गुपित ,माझ्या लढण्याचे बळ , माझे मार्गदर्शक , माझी ताकद , माझा पाठीराखा ,माझा बापमाणुस. अशाच प्रकारे वडिलांच्या आठवणीत अश्विनीने ही पोस्ट शेअर केली आहे.