ज्येष्ठ दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येमुळे बॉलीवुड तसेच मराठी इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. स्वतःची वेगळी निर्माण करणारे नितीन देसाई यांचा जीवन प्रवास काय सोपा नव्हता. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी एनडी स्टुडिओमध्ये अखेरचा श्वास घेतला. २ दिवसानंतर आज नितीन देसाई यांच्या पार्थिवावर एनडी स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. आज सकाळपासून एन डी स्टुडिओच्या बाहेर गर्दी झाली होती. नितीन देसाई यांच्या मोठ्या मुलीने त्यांना खांदा दिला आहे.
दिग्दर्शक रवी जाधव, सुबोध भावे, अभिजीत केळकर, मानसी नाईक, रीना मधुकर यांसारख्या मराठी सिनेसृष्टीतिल कलाकारांनी नितीन देसाई यांच्या पार्थिवावर अंतिम दर्शन घेतले. बॉलीवुड मधील आमीर खान, संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर, अभिनेते मुकेश ऋषि, अभिनेते मनोज जोशी यांनी अंतिम दर्शन घेतले.
नितीन देसाई यांची पत्नीचा अश्रूंचा बांध फुटला आहे. त्यांची मुलगी मानसी, जावई यांना पार्थिव बघून अश्रु अनावर झाले. घरातील सदस्य त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत आहे. कलाकारांनी देखील त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. त्यांच्या अशा जाण्याने देसाईनच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.








