लाडाची मी लेक गं या मालिकेत आरोह वेलणकर आणि उमेश जगताप झळकणार

झी मराठी वाहिनीवर लवकरच आपल्याला एक नवीन मालिका पाहायला मिळणार आहे. या मालिकेचे नाव आहे लाडाची मी लेक गं. या मालिकेचा पहिला प्रोमो जेव्हा टीव्ही वर झळकला तेव्हा आपल्याला या मालिकेत मिताली मयेकर मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे आणि अभिनेत्री स्मिता तांबे नकारात्मक भूमिका साकारत असल्याच समजत. या दोघी व्यतिरिक्त या मालिकेत अजून कोण कोण दिसणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्साहित आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

लाडाची मी लेक गं या मालिकेत जरी आपल्याला मिताली मायेकर आणि स्मिता तांबे प्रोमो मध्ये दाखवले असले तरी या मालिकेत अभिनेता कोण असणार हे प्रोमो मध्ये दाखवले नाही. परंतु आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार या मालिकेत अभिनेता आरोह वेलणकर आणि अभिनेता उमेश जगताप हे देखील या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारनार आहेत. आरोहला आपण सर्वानी बिग बॉस मराठी सीजन 2 मध्ये पाहिल आहे. त्याने बिग बॉस मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री घेतली होती. तसेच उमेश जगताप यांनी तुला पहाते रे या मालिकेत विक्रांत सरांजमे यांच्या मित्राची भूमिका साकारली होती. ते देखील आपल्याला लाडाची मी लेक गं या मालिकेत दिसणार आहेत.

मिताली मायेकर या मालिकेत कस्तुरीची तर आरोह या मालिकेत सौरभची मुख्य भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळेल. या मालिकेमुळे आत्ता कोणती मालिका बंद होणार हे अजून तरी स्पष्ट नाही. परंतु मिसेस मुख्यमंत्री मालिकेच्या वेळीच या नवीन मालिकेचे देखील प्रक्षेपण होणार आहे त्यामुळे मिसेस मुख्यमंत्री ही मालिका बंद होण्याची जास्त शक्यता आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय? कोणती मालिका बंद केली पाहिजे? ते कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करून नक्की सांगा.

Title: Aroh Welankar and Umesh Jagtap will play important role in Zee Marathi serial Ladachi Me Lek Ga

https://www.instagram.com/p/CEiqhVjHp-H/

Tags: Ladachi mi lek ga serial cast, ladachi mi lek ga actors, ladachi me lek ga actress name

Leave a Comment