अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर दिसणार या नवीन मालिकेत

झी मराठी वाहिनीवरील गाजलेली मालिका ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील सर्वांची लाडकी शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हि पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेत अपूर्वाने साकारलेली शेवंता ची भूमिका प्रेक्षकांना फारच आवडली. शेवंता या पात्राने कित्येक प्रेक्षकांना वेड लावले होते. मालिका जरी संपली असली तरी अपूर्वाबद्दल प्रेम प्रेक्षकांच्या मनात आजही आहे.     

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अपूर्वाच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पुन्हा एकदा अभिनय साकारताना दिसणार आहे. झी युवा वाहिनीवरील ‘तुझ माझं जमतंय’ या नव्याने सुरु होणाऱ्या मालिकेत अपूर्वा अभिनय साकारणार आहे. हि मालिका विनोदी असणार असून या मालिकेत अपूर्वा पम्मी हि भूमिका साकारणार आहे. तुझ माझं जमतंय हि नवी मालिका ४ नोव्हेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता झी युवा वाहिनीवर प्रसारित होणार आहे.     

https://www.instagram.com/p/CGFZRXOjoAL/

Tags: apurva nemlekar new serial tujha majha jamtay

Leave a Comment