संपूर्ण कोल्हापूरातील रिक्षाचालक ज्या गोष्टीची वाट बघत आहेत ती लवकरच पार पडणार आहे आणि ती म्हणजे रिक्षा युनियनच्या अध्यक्ष पदाची निवडणूक. अर्थातच इतर कर्मचार्यांच्या मते ती या निवडणुकीस उभी रहाण्यास पात्र आहे, आणि म्हणूनच सगळ्यांच्या इच्छेचा मान राखून या निवडणूकेमध्ये अंतरा उभी रहाण्यास तयार देखील झाली आहे. पण ती अजूनही द्विधा मनस्थितीत अडकली आहे कारण तिला एका गोष्टीची पूर्ण कल्पना आहे की, मल्हारचा याला पूर्णत: विरोधात आहे. परंतू आजवर रिक्षा कामगार आणि सामान्य जनतेच्या हक्कासाठी झटत आलेल्या अंतरासमोर आता हा एकमेव पर्याय आहे, ज्याद्वारे ती कामगारांच्या हक्कासाठी लढू शकेल. कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिका आता वेगळ्या वळणावर येऊन पोहचली असून रिक्षाचालकांच्या मदतीसाठी अंतरा मैदानात उतरणार आहे. तेव्हा या निवडणुकीत अंतरा जिंकून येईल का ? मल्हार आणि सुहासिनीची तिल साथ मिळणार का ? अंतरावर मल्हार विश्वास ठेवणार का ? हे जाणून घेण्यासाठी बघा जीव माझा गुंतला मालिकेचा कामगार दिन विशेष सप्ताह १ मे ते ५ मेआपल्या कलर्स मराठीवर. महारविवार एका तासाचा विशेष भाग १ मे रोजी दुपारी २ आणि रात्री ९. वा. आणि २ मे ते ५ मे रात्री ८.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
