Ankita and Suraj Chavhan BBM : सूरजच्या घरी मिळालेल्या वागणुकीबद्दल अंकिता स्पष्ठच बोलली..अंकिताच्या भावनांचा बांध फुटला..म्हणाली आता मला यात फसायच नाही!

Ankita and Suraj Chavhan BBM : ‘बिग बॉस मराठी ५’ या शोमधून घराघरात पोहोचलेले सूरज चव्हाण आणि अंकिता प्रभू वालावलकर यांच्यातील नातं बिनसल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. सोशल मीडियावर त्यांचे चाहते या विषयावर चर्चा करत असून त्यांच्यातही एकप्रकारची ‘कोल्डवॉर’ सुरू झाल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अंकिता सूरजच्या गावी भेटायला गेली होती, पण तेव्हा त्यांच्यात एक प्रकारचा तणाव निर्माण झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर सूरजच्या सोशल मीडिया अकाउंटवरून अंकितासोबतचे काही कोलॅब व्हिडिओ डिलीट करण्यात आले, ज्यामुळे त्याच्या वागण्यावर अंकिताच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अंकिताने या घटनांवर आपल्या भावना तिच्या युट्यूब चॅनेलवर मांडल्या. ‘कोकण हार्टेड गर्ल’ नावाच्या तिच्या चॅनेलवर अंकिताने एक नवा व्हिडिओ शेअर केला, ज्यात तिने ‘माझ्याकडून आता अपेक्षा नसाव्यात, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर’ असे शीर्षक दिले. या व्हिडिओतून अंकिताने तिच्या नाराजीची स्पष्ट व्याख्या केली आहे आणि सूरजबद्दल तिला असलेल्या काही गोष्टी सांगितल्या आहेत.

अंकिताच्या चाहत्यांनी सूरजला ट्रोल करायला सुरुवात केल्याने, सूरजनेही सोशल मीडियावर स्टोरी टाकून सर्वांसमोर माफी मागितली होती. अंकिता जेव्हा बारामतीला गेली होती, तेव्हाही तिच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आली होती. या भेटीदरम्यान तिला सूरजच्या काही गोष्टी खटकल्या, हे तिने स्पष्टपणे बोलून दाखवलं.

Abeer Gulal off Air : अचानक मालिका संपणार असल्याची बातमी; अक्षय केळकर म्हणतो, ‘आता पुन्हा स्ट्रगल करावा लागणार …’”

अंकिताने तिच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की, सूरजवर कोणीही राग धरू नये. ती म्हणाली की, “सूरजला ज्याप्रमाणे सांगितलं जातं, त्याप्रमाणेच तो वागतो.” तिने सूरजसह त्याची बहीण सीता हिचंही कौतुक केलं, ज्यांनी अंकिताचं अतिशय हसतमुखाने स्वागत केलं होतं. अंकिता म्हणाली, “मी त्याला नॉमिनेट करायचे कारण असं नव्हतं की त्याला मत मांडता येत नाही. पण आता सर्वांना हे समजले असेल की, त्याला मत मांडणं फार कठीण जातं, त्यामुळेच तो काही गोष्टींमध्ये फसतो.”

Tharal Tar Mag : ठरलं तर मग मालिकेतील ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात होणार आई.. दिली मोठी गुड न्यूज़..

सूरजच्या मुद्द्यावर अंकिताला शांत राहण्याचा सल्ला तिच्या टीमकडून मिळाला होता. मात्र, तिने शांत बसण्याचा प्रयत्न केला तरी सोशल मीडियावर तिचं ट्रोलिंग थांबत नव्हतं. अंकिताने या ट्रोलिंगबद्दल सांगितलं की, तिला तिच्या व्यस्त वेळापत्रकात या गोष्टींवर फारसं लक्ष देण्यास वेळ नाही. पण तिचे चाहते तिला या सर्वांबद्दल अपडेट्स देत राहतात.

बिग बॉस संपल्यानंतर अनेक स्पर्धक सूरजच्या घरी गेले होते, परंतु अंकिता मात्र उशिरा गेल्यामुळे तिच्यावर टीका झाली. याबाबत बोलताना ती म्हणाली, “प्रत्येक जण त्याला मिळणाऱ्या वेळानुसार जातो. मी तर आता जाणारच नव्हते, पण अचानक सूरजचा फोन आला की, सगळे भेटून गेले, तू का आली नाहीस? परंतु हे त्याचं वाक्य नव्हतं, कुणीतरी त्याला असं बोलायला लावलं.”

Driving Licence News : सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय.. तुमच्याकडे जर कार चालवण्याच ड्राइविंग लाइसेंस असेल तर..

तसेच सूरजचा वापर कोणीतरी करत असल्याचं अंकिताला वाटतंय. ती म्हणाली, “सूरजवर कोणीही प्रेम करतंय, पण आता बाहेर आल्यावर तो तसा राहिलेला नाही. त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांनी त्याला असं वापरलं जाऊ न देता त्याला आधार द्यावा.”

सूरजला राजकीय नेते अजित पवार घर बांधून देणार आहेत, त्याविषयी अंकिताने पवार यांचे आभार मानले. मात्र, तिने पुढे सांगितलं की, “या घरासाठी काही मागण्या होत असल्याचं मला नंतर समजलं, जे विचित्र वाटलं.” त्यामुळे या सर्व वादांपासून तिला लांब राहायचं आहे, असं अंकिताने स्पष्ट केलं.

Marathi Actress about hindi movies casting : मराठी अभिनेत्र्यांना हिंदी मध्ये काम वाल्या बाईच पात्र का भेटत! या अभिनेत्रीने सांगितल पड्यामागच खर सत्य!

अंकिता पुढे म्हणाली, “फक्त सूरजचा फॅनबेस आहे असं नाही, माझाही चाहतावर्ग आहे. मी शांत बसणं म्हणजे मी माझ्या चाहत्यांना उत्तर न देण्यासारखं आहे.” तिने सांगितलं की, सूरजच्या घरी भेट दिल्यानंतर तिने सूरजसोबत २-३ कोलॅब व्हिडिओ केले, पण ते नंतर सूरजच्या अकाउंटवरून डिलीट झाले. त्यानंतर तिला सूरजने अनफॉलोही केलं.

अंकिताने व्हिडिओत सांगितलं की, “जेव्हा एक खोटं बोललं जातं, तेव्हा त्याला झाकण्यासाठी हजार खोटं बोलावं लागतं.” ती म्हणाली की, सूरजवर त्याच्या चाहत्यांनी विश्वास ठेवावा आणि त्याला समजून घ्यावं.

Leave a Comment