Man Dhaga Dhaga Jodate Nava New Twist : स्टार प्रवाह वरील मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचा नुकताच एक नवीन प्रोमो समोर आला आहे. यामध्ये आनंदीची मालिकेत पुन्हा एकदा ग्रँड एन्ट्री दाखवण्यात आली आहे. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेने अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील सार्थक आणि आनंदी ची जोडी प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरत होती. परंतु या मालिकेत सहा वर्षाचा लीप आल्यानंतर आनंदी मालिकेतून गायब झाली.
तिच्या जागी सुखदा म्हणजेच अभिनेत्री मयुरी देशमुख हिची एन्ट्री झाली. पण प्रेक्षकांना मात्र आनंदी गायब झाल्यामुळे या मालिकेत काही रस वाटत नव्हता. पण आता पुन्हा एकदा या मालिकेत आनंद देणारा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत पुन्हा एकदा आनंदीची एन्ट्री होणार आहे.

नवीन प्रोमोमध्ये दिसत आहे की सार्थकची आई अशी इच्छा व्यक्त करते की आता सुखदा आणि सार्थक यांनी कायमचे एकत्र राहावे. सुखदा आणि सार्थक मिळून चाफ्याचे झाड लावत असतात. तेव्हा सार्थक म्हणतो की “माझं चाफ्याची जुनं नातं आहे”. सार्थकची आई अशी इच्छा व्यक्त करते की या दोघांमध्ये कोणी यायला नको. त्यावेळीच आनंदीची मालिकेत एन्ट्री झालेली दाखवण्यात आली आहे.
आणखी वाचा :
Bigg Boss Marathi 5 Update : बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी.. आता फक्त
आनंदी एका मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला शांत करते, तेव्हा तिला चाफ्याचं फूल भेट म्हणून मिळतं आणि तिचे नाव आनंदी नसून कल्याणी असे आहे. म्हणजे आनंदी आत्ता नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता सार्थक आणि आनंदी समोरासमोर कधी येतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर मित्रांनो तुम्ही आनंदीची ग्रँड एन्ट्री पाहायला उत्सुक आहात का ते कमेंट करून नक्की सांगा.