‘देवमाणूस 2’ या मालिकेला निरोप देताना निर्माती-अभिनेत्री श्वेता शिंदेची भावुक पोस्ट

झी मराठीवाहिनी वरील ‘देवमाणूस’ ही सगळ्यांच्या आवडीची मालिका होती. ‘देवमाणूस’ ही मालिका म्हणजे एक आगळीवेगळी कहाणी होती. या मालिकेने प्रेक्षकांना अगदी वेड लावले होते. प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद बघता या मालिकेचा दूसरा भाग म्हणजेच ‘देवमाणूस 2’ देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला. आणि मालिकेच्या दुसऱ्या भागाने देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवल. या मालिकेमधून अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री अस्मिता देशमुख घराघरात पोहोचले. आता याच प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेने निरोप घेतला आहे. याबाबत मालिकेची निर्माती- अभिनेत्री श्वेता शिंदे हिने एक भाऊक पोस्ट शेअर केली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

चला हवा येऊद्या या मालिकेच्या सेट वरील फोटो शेअर करत या फोटोला एक भावूक कॅप्शन दिले आहे. ‘नेहमी एखाद्या मालिकेचं , नाटकाचं , चित्रपटाचं प्रमोशन करण्यात येणाऱ्या सर्वांच्या लाडक्या ‘ चला हवा येऊ द्या ‘ मध्ये आज पहील्यांदाच एका मालिकेचा निरोप समारंभ साजरा केला जाणार आहे . एका निर्मातीला आणि काय हवं ? इतकं प्रेम , इतका लळा … ‘ देवमाणूस ॥ ‘ ह्या मालिकेद्वारे आम्हाला आज तुमचा निरोप घेताना ऊर भरून आलाय … आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एक असा टर्निंग पॉइंट येतो जो आपल्याला खूप काही देऊन जातो … झी मराठी वाहिनीवरील ‘ देवमाणूस ‘ आणि ‘ देवमाणूस ‘ ह्या मालिका म्हणजे माझ्या आणि वज्र प्रोडक्शन्सच्या कारकिर्दीतील खरा टर्निंग पॉइंट ठरल्या . १०:३० च्या स्लॉटला स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करत … कधी प्रेक्षकांचा रोष तर कधी प्रेक्षकांचे भरभरून प्रेम आम्ही अनुभवले . झी मराठी वाहिनीचा भक्कम आधार , मालिकेतील सर्वच गुणी कलाकारांचे आणि तांत्रिक विभागाचे सहाय्य आणि मायबाप प्रेक्षकांच्या आशीर्वादानेच आम्ही हा इतका मोठा पल्ला पार करू शकलो . यापुढे देखील वज्र प्रॉडक्शन्स सध्या झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘ अप्पी आमची कलेक्टर ‘ आणि यांसारख्या अनेक एकापेक्षा एक सरस कलाकृती घेउन येईल आणि तुमचे मनोरंजन करत राहील याची मी खात्री देते . निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी , चुकले आमचे काही , त्याची क्षमा असावी ! असे पोस्ट शेअर करत श्वेताने म्हंटल आहे.

आता ‘देवमाणूस 3’ बद्दलच्या रंगू लागल्या आहेत. ‘देवमाणूस 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच म्हंटल जात आहे.

Leave a Comment