विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित चंद्रमुखी या बहुप्रतीक्षित सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे .आपल्या दिलखेचक अदांनी भुरळ घालणाऱ्या चंद्रमुखी ची भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकरने साकारली आहे .चंद्राच्या डान्सने आणि तिच्या अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधले.नुकताच अमृताने नथी बद्दलचा एक किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे .तिने शेअर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलंय की,
माझ्या दिग्दर्शकाला प्रसाद ओक ला सगळं ओरिजिनल हवं होतं …. तेव्हा ” अमृता नाक टोचायचं …. क्लिप वाल्या नथी मी तुला घालू देणार नाही ” असं त्यांनी पहिल्याच मीटिंग मध्ये सांगितलं … आणि म्हणूनच अश्या पद्धतीने मी अडीच वर्षां पूर्वीच नाक टोचलं त्या नंतरही ते बुजलं..दुखले . …… मग परत टोचावं लगलं … पण शूटिंग पर्यंत नथ आणि माझी जुगलबंदी सुरूच राहिली …. त्यात पु. ना . गाडगीळ ह्यांनी खऱ्या सोन्याच्या नथीं केल्या तेवहा नाचताना त्या इतक्या जड होत असत कि पॅकअप नंतर त्या वरचं रक्त आधी कोमट पाण्याने आम्ही काढायचो आणि मग नाथ काढायचो . पुढे अमृताने तर चंद्रा ची कुठली नथ तुम्हाला जास्त आवडली ओ ? असा चाहत्यांना प्रश्न केलाय .