सोनी मराठीवर ‘चांदणे शिंपीत जाशी’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेमद्धे मिसेस मुख्यमंत्री फेम अभिनेत्री अमृता धोंगडे प्रमुख भुमिकेत दिसणार आहे. घर आणि गॅरेज सांभाळून कष्ट करणाऱ्या मुलीची भूमिका अमृता साकारनार आहे. ह्या मालिकेत नागेश भोसले हे अमृताच्या वडिलांच्या भुमिकेत पाहायला मिळणार आहे. मिसेस मुख्यमंत्री मधील सुपरहिट भूमिकेनंतर अमृता पुन्हा एकदा काहीश्या वेगळ्या भुमिकेत पाहायला मिळणार आहे.
सोनी मराठी वर ‘चांदणे शिंपीत जाशी’ ही नवी मालिका २८ डिसेंबर पासुन सोमवार ते शनिवार रात्री ७.३० वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
Tags: Amruta Dhongade new serial chandane shimpit jashi