कलर्स मराठी वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेने अगदी काही दिवसांतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील लतिका आणि अभि यांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. या मालिकेत अभिनेत्री अक्षया नाईक आणि समीर परांजपे मुख्य भूमिका साकारत आहेत. अक्षया ने यापूर्वी ये रिशता क्या कहलाता है या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. परंतु सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमुळे ती प्रकाश झोतात आली.
पहिल्याच दिवशी अक्षयाने मोठ्या उत्साहाने मालिकेचे शूटिंग सुरू केले. मोठ्या मेहनतीने ही हे पात्र साकारत आहे. मालिकेचा पहिला एपिसोड जेव्हा प्रसारित झाला तेव्हा मात्र तो एपिसोड पाहून अक्षया खूपच भावुक झाली. मनात दडलेल्या भावनांना वाट करून देत ती ढसाढसा रडली. तिला रडताना पाहून सेट वरील सर्जनांना प्रश्न पडला की ही का रडत आहे? परंतु ती रडत नसून ते तिचे आनंदाश्रू असल्याचे तिने सांगितले.