अक्षया आणि सुयश यांच्या नात्यात दुरावा? ब्रेकअप झाल्याच्या चर्चा

सिनेसृष्टीतील कलाकारांचे लग्न, ब्रेकअप, घटस्फोट, रिलेशनशिप अशा गोष्टी नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. सध्या मराठी कला विश्वातील एक जोडप्याचे ब्रेकअप झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री अक्षया देवधर आणि का रे दुरावा फेम अभिनेता सुयश टिळक यांच्या नात्यात काही तरी बिनसल्याचे दिसून येत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अक्षया आणि सुयश दोघे मिळून आपापल्या सोशल मीडिया अकाऊंट वर एकमेकांसोबतचे खूप सारे फोटो शेयर करत असत. परंतु अलीकडे ते एकमेकांचे फोटो शेयर करताना दिसत नाहीत. शिवाय सुयशने आपल्या अकाऊंट वरील अक्षया सोबतचे काही फोटो डिलीट देखील केले आहेत. अक्षयाने सुयशला आणि सुयशने अक्षयाला instagram वरून एकमेकाना Unfollow देखील केले आहे.

काही दिवसांपूर्वी सुयश आणि अक्षया यांनी एकत्र एक फोटो पोस्ट केला होता. अक्षयाच्या हातातली अंगठी पाहून चाहत्यांनी सुयश आणि अक्षया यांचा साखरपुडा झाल्याचा अंदाज लावला होता. शिवाय त्यांचे खूप सारे एकत्र फोटो आणि त्यांचे फोटो खालचे Caption वाचता दोघे प्रेमात असल्याचे दिसत होते.

Title: Akshaya Deodhar and Suyash Tilak Breakup

Tags: Akshaya Deodhar and Suyash Tilak Breakup, Akshaya Deodhar Breakup, Suyash Tilak Breakup

Leave a Comment