श्रावण महिन्यातील मंगळागौर या खेळाची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. बऱ्याच मालिकांमध्ये मंगळागौरचे एपिसोड टेलिकास्ट केले जात आहेत. लग्नानंतरची पहिली मंगळागौर ही नवविवाहित वधूसाठी खास असते. सर्वांची लाडकी जोडी अक्षया आणि हार्दिक यांची मंगळागौर नुकतीच थाटामाटात पार पडली आहे. लग्नानंतरची त्यांची ही पहिली मंगळागौर खूपच खास होती. त्यांच्या मंगळागौरचे फोटो आणि विडियो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.
काही दिवसांपूर्वी अक्षयाने सोशल मीडियावर मंगळागौरच्या मेहंदीचा खास विडियो शेअर केला होता. तेव्हापासून त्यांचे चाहते मंगळागौरसाठी खूपच उत्सुक होते. अक्षया आणि हार्दिक दोघेही मंगळागौर लुक मध्ये खूपच सुंदर दिसत होते. दोघांनीही मॅचिंग केल्याचं फोटोवरून दिसतयं . हिरव्या आणि सोनेरी कलरचे कॉम्बिनेशन दोघांनी केले आहे. दोघांनी महादेवाची छान अशी सजावट करून, विधिवत पूजा देखील केली आहे.
दोघांच्या चाहत्यांनी तसेच कलाकारांनी फोटोज आणि विडियोला खुप साऱ्या लाईक आणि कमेन्टचा वर्षाव केला आहे. तुम्हाला अक्षया आणि हार्दिक यांचा मंगळागौर लुक आवडला का? तुम्हाला हार्दिक – अक्षयाची जोडी आवडते का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.




