स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील पश्या आणि अंजीची जोडी प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. पश्या आणि अंजीच्या नात्यातील रुसवा फुगवा, प्रेम, खट्याळपणा प्रेक्षकांना फारच पसंतीस पडत आहे. तर आज आपण या मालिकेतील अंजी आणि पश्या यांच्या रीयल लाइफ बद्दल जाणून घेणार आहोत.
सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत पश्या हि व्यक्तिरेखा अभिनेता आकाश नलावडे साकारत आहे. आकाश हा मूळचा पुण्याचा. त्याचा जन्म ८ सप्टेंबर १९९१ रोजी पुण्यात झाला असून त्याचे बालपण देखील पुण्यातच गेलं. आकाशचे शालेय शिक्षण पुण्यातील महाराष्ट्र विद्यामंडळ येथून पूर्ण झाले असून त्याचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील कावेरी कॉलेज मधून पूर्ण झाले आहे. त्याने कॉमर्सची पदवी प्राप्त केली. अभिनय क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना आकाशने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. आकाशने पुण्याच्या ललित कलाकेंद्रातून अभिनयाचे धडे घेतले आहेत.
आकाशने सहकुटुंब सहपरिवार या त्याच्या पहिल्याच मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतून आकाश घराघरांत पोहचला. आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. लवकरच आकाश ‘रुणवहिनी’ या मराठी चित्रपटात देखील दिसणार आहे.
सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत अंजी हि भूमिका अभिनेत्री कोमल कुंभार साकारत आहे. कोमलची ‘सहकुटुंब सहपरिवार’ हि पहिलीच मालिका. कोमलला अभिनयासोबतच गायनाची देखील फार आवड आहे. ती केवळ एक अभिनेत्री नसून एक उत्तम गायिका देखील आहे. कोमलने शॉर्ट फिल्म मध्ये देखील काम केले आहे. ‘अड्डा’ या शॉर्ट फिल्ममध्ये तिने अभिनय साकारला होता.
तर मित्रांनो अंजी आणि पश्या यांची जोडी तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेन्ट करून सांगा.
Tags: akash nalawade, komal kumbhar